health-fitness-wellness

Video : गर्भारपणातील व्यायाम 

डॉ. प्रेरणा बेरी कालेकर, गर्भपूर्व व गर्भारपणातील व्यायाम मार्गदर्शक

बाळाची चाहूल लागली की घरात आनंद पसरतो.  गर्भार स्त्रीने काय खावे आणि काय नाही, तिने कसं काम करावं, याबद्दल तिला सल्ले दिले जातात. आहार, विहार आणि औषधोपचार या तीन स्तरांवर गर्भिणींना अधिक काळजी घ्यावी लागते. 


गर्भारपणातील व्यायाम तज्ज्ञ या नात्याने सथ्याच्या काळात घरच्या घरी करता येतील असे व्यायाम मी‌ सुचवत  आहे. या व्यायामाची चित्रफीत सकाळच्या गर्भ केयर या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. ती पाहूनच हे व्यायाम करावेत. 

गर्भावस्थेत योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास खालील फायदे होतात - 

- शारीरिक व मानसिक क्षमता वाढते. गर्भारपणात काळात शरीरमनावर जो ताण येतो तो घालवण्यासाठी व्यायाम उपयुक्त ठरतात. 

- या काळात अपरिहार्य असलेल्या हार्मोनल बदलांपैकी चांगल्या बदलांना उत्तेजन मिळते. 

- पचन चांगले होऊन पोट साफ राहते. त्यामुळे आरोग्य उत्तम राहते. 

- झोप चांगली लागते  उत्साह वाढतो. 

- फिटनेस वाढतो आणि गर्भारपणाच्या ताण सोसण्याची ताकद मिळते. 

- सांध्यांची लवचिकता आणि ताकद वाढते 
व्यायामाचे महत्त्व सांगितल्यावर आता कोणते आणि कसे व्यायाम करावेत,  हे पाहू. 

व्यायामाचे ३ प्रकार आहेत -
उभे व्यायाम, बैठे व्यायाम आणि खाली बसून करायचे व्यायाम. त्यापैकी आपण  उभे राहून करायचे व्यायाम पाहू. या प्रकारात आपण सर्व सांध्यांना व्यायाम घडवतो. यात स्ट्रेचिंग प्रकारचे व्यायाम असतात. त्यामध्ये मानेचे, मनगटाचे, हाताचे , खांद्याचे व्यायाम, 
ट्विस्टिंग आणि दोन्ही बाजूंना वाकण्याचे व्यायाम यांचा समावेश आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT