म्युकर मायकोसिस
म्युकर मायकोसिस e sakal
health-fitness-wellness

काळ्या बुरशीला दूर ठेवण्यासाठी काय करावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रुग्णाला मधुमेह (diabetes), कॅन्सर (cancer), एचआयव्हीसारखे (HIV) आजार असतील तर आधीच त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोविडनंतर अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा जास्त धोका असतो. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर काहीही त्रास किंवा शंका आल्यास डॉक्टरांकडे जाउन निदान करुन घ्यावे. वेळीच उपचार सुरु करावे. यामुळे पुढे भविष्यात होणाऱ्या गंभीर व गुंतागुंतीच्या तक्रारींना आळा घालण्यास मदत मिळते, असे मत डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केले. (expert comment on how to keep away black fungus)

म्युकरमायकोसिस अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळतो. याला कारण म्हणजे या बुरशीच्या वाढीसाठी गरजेचे असलेले ह्युमिड ट्रॉपिकल वातावरण. दमट व ओलसरपणा असलेल्या अनेक ठिकाणी ही काळी बुरशी दिसून येते. याचे स्पोअर्स, फिलामेन्ट हवेतून नाक, तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतात. तोंडाद्वारे ही बुरशी हळूहळू थेट फुफ्फुसांवर आक्रमण करते तर नाकाद्वारे ही बुरशी डोळे आणि मेंदूवरही आघात करते. मधुमेहामुळे इम्युनिटी काहीशी कमी झालेली असते. त्यामुळे डायबेटीसच्या रुग्णांनी कोविडकाळात आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. तत्काळ उपचारातून या बुरशीपासून सुटका मिळते अन्यथा या बुरशीमुळे प्रादुर्भाव झालेला भाग शस्त्रक्रिया करुन काढून टाकावा लागतो, असे ते म्हणाले.

आहारावर भर -

  • सकस आहारावर भर असावा

  • प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा

व्यायाम करा -

  • योगासने करावी

  • घरीच व्यायाम करावा

काय असतात लक्षणे -

  • नाक, तोंडातून काळा स्त्राव येतो

  • जबड्यात, डोळ्यांशेजारी काळे व्रण.

  • घशात सूज, वारंवार डोकेदुखी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT