Home Workout ideas Esakal
health-fitness-wellness

Workout In Monsoon : बाहेर सतत पाऊस पडतोय, मग घरातच करा हे एक्सरसाईज, Gym Workout प्रमाणे कॅलरी होतील बर्न

Workout Tips In Monsoon : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत पाऊस पडत असल्यास अनेकदा रनिंग किंवा जॉगिंगला जाणं Jogging देखील शक्य होत नाही. तर पावसामुळे जीमला जाण्याचा देखील अनेकांना कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही घरातच काही एक्सरसाइज करू शकता

Kirti Wadkar

Home Workout ideas:पावसाळ्यामध्ये विविध आजारांची साथ पसरते. इतर दिवसांच्या तुलनेत या काळामध्ये आजारी पडण्याची शक्यता जास्त वाढते. वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. या आजारांपासून बचाव करण्यासाठी पावसाळ्यामध्ये Monsoon रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणं गरजेचं आहे. Fitness Tips Marathi Home Exercise Tips for Monsoon Season

अर्थात यासाठी पौष्टिक आहार Healthy Diet घेणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत नियमित एक्सरसाइज करणंही तितकच महत्वाचं आहे.पावसाळ्यात निरोगी राहायचं असेल तर शरीर तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुमची फुफ्फुसं निरोगी राहण्यासाठी आणि इंफेक्शनचा Infection धोका टाळण्यासाठी काही व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत पाऊस पडत असल्यास अनेकदा रनिंग किंवा जॉगिंगला जाणं Jogging देखील शक्य होत नाही. तर पावसामुळे जीमला जाण्याचा देखील अनेकांना कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही घरातच काही एक्सरसाइज करू शकता. या एक्सरसाइजमुळे तुम्हाच्या कॅलरीजही बर्न होतील शिवाय तुम्हाला फिट राहण्यास मदत होईल.

ब्रिदिंग एक्सरसाइज- घरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळी किमान १० मिनिटांसाठी ब्रिदिंग एक्सरसाइज म्हणजेच श्वसनाचे व्यायाम किंवा प्राणायाम करू शकता. यामुळे तुमची फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होईल. तसंच तुमचं श्वसनतंत्र मजबूत होऊन इंफेक्शन, एलर्जी आणि फ्लूपासून तुमचं रक्षण होईल.

शिवाय या व्यायाम प्रकारामुळे ताण-तणाण कमी होण्यासही मदत होते.

जंपिंग जॅक्स- जंपिंग जॅक्स हा एका प्रकारचा फूल बॉडी वर्कआउट आहे. शिवाय साठी तुम्हाला कोणत्याही equipmentची आवश्यकता नाही. या एक्सरसाईजमुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. तसचं यामुळे तुमच्या पाठीचा कणा मजबुत होण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीही तुम्ही ही एक्सरसाइज घरातच करू शकता.

पुशअपस्- पाठीचे, पोटाचे तसंच हातांचे स्नायू मजबूत करण्यासाठी तुम्ही पुशअपस् मारू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार पुशअपस् चे वेगवेगळे प्रकारही ट्राय करू शकता. जर तुम्हाला जमिनिवर पुशअपस् मारणं कठिण वाटत असेल तर तुम्ही वॉल पुशअपस् देखील मारू शकता.

हे देखिल वाचा-

स्क्वॉट्स- पायांचे स्नायू तसचं पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी हा एक उत्तम एक्सरसाइजचा पर्याय आहे. त्याचप्रमाणे वेटलॉससाठी देखील तुम्ही घरीच १५ Squat चे ३ सेट मारू शकता.

क्रन्चेस- जर तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल तर तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. यामुळे पोट कमी होवून पोटाचे स्नायू मजबूत होतात. तुम्ही घरीच एखाद्या मॅटवर ही एक्सरसाइज करू शकता. यात तुम्ही फूल क्रन्चेस किंवा क्रॉस क्रन्चेस करू शकता.

प्लॅन्क – पोट कमी करणं तसंच पाठीचे स्नायू मजबूत करण्यासाठी तुम्ही घरातच प्लॅन्क किंवा साईड प्लॅक हा व्यायाम करू शकता.

याशिवाय तुम्ही लंजेस, लेग एक्स्टेन्शन , लेग राइझ, साइज लेग राइझ, माउंटन क्लायबिंग असे काही एक्सरसाइजचे प्रकार घरातच करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या equipment ची तसंच मोठ्या जागेची आवश्यकता नाही.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT