bela-lodge 
health-fitness-wellness

वेटट्रेनिंगमधून लवचीक शरीर!

बेला लोळगे, मॉडेल

फिटनेस आणि वेलनेस या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. मी फिटनेसकडं दीड-दोन वर्षांपूर्वी विशेष लक्ष देण्यात सुरुवात केली. त्यावेळी माझं वजन ४५ किलो होतं. मला त्यात वाढ करणं गरजेचं होतं. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली. नांदेडमधील एसजीजीएस कॉलेजमध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेत असतानाच मी वर्कआउट सुरू केला. माझा दिवस पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा. त्यावेळी मी ग्राउंडवर रनिंग करत असे. त्यानंतर दिवसातून दोन वेळा दोन-दोन तास डान्स करत होते. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मी औरंगाबादला आले. त्यावेळी घरी योगासने, सूर्यनमस्कार आणि वर्कआउट करत होते. त्याचबरोबर रनिंगही करत होते. फक्त वर्कआउट महत्त्वाचं नसून, योग्य आहारही आवश्‍यक असल्याचं यावेळी माझ्या लक्षात आलं. त्यासाठी मी आहारतज्ञांशी चर्चा केली. माझ्या शरीराला आवश्यक कॅलरीज मी मोजून खाते. शरीरात कार्बोहायड्रेड्स, प्रोटीन आणि फॅट गेले पाहिजे, याचा विचार मी करते. आपल्या शरीराला कोणत्या गोष्टी किती प्रमाणात पाहिजेत, याचा अंदाज येतो. त्यामुळं मी लागलीच गोड खाणं बंद केलं. वेगवेगळ्या प्रकारची फळं, बदाम, काजू तसेच सब्जा बी आणि मनुकेही खाते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वेटट्रेनिंगही महत्त्वाचे 
वर्कआउटमध्ये वेट ट्रेनिंग ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अनेकांचा गैरसमज आहे की, मुलींनी वेटट्रेनिंग केल्यास त्यांचं शरीर मुलांसारखं होतं. हे साफ चुकीचे आहे. मुलींनी वेटट्रेनिंग केल्यास शरीर लवचीक होतं. मी वेटट्रेनिंग बरोबरच पाय, बॅक, चेस्ट व कार्डिओ करते. अंगातून घाम निघेपर्यंत मी एक्सरसाइज करत असते. आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस मी व्यायामावर भर देते; तसेच न चुकता आठ तास झोप घेते. झोप व्यवस्थित झाली न झाल्यास शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. मी फेस एक्सरसाइजही करते. त्यामुळं चेहऱ्याला नैसर्गिक सौंदर्य मिळते. चेहऱ्यावरील स्नायू चांगले राहून करिअरसाठी फायदा होतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आहाराचे गणित 
माझ्या आहारात पोळी आणि भाजीचा समावेश असतो. मी सकाळी उठल्यावर एक लीटर पाणी व त्यानंतर ग्रीन टी पिते. वर्कआउटनंतर प्रोटीन खाते. त्यामध्ये प्रामुख्याने अंडी आणि चिकनच्या समावेश असतो. दुपारी एक पोळी आणि भरपूर भाजी खाते. त्याचबरोबर सलाडही आहारात असते. त्यानंतर भूक लागल्यास फळे खाते. संध्याकाळी सातपूर्वी रात्रीचं जेवण झालेलं असतं. त्यामध्ये फक्त तीन-चार प्रकारच्या उकडलेल्या भाज्या असतात. मी दुसरे काहीही खात नाही. मला गोड खूप आवडतं. मात्र मी त्यावर खूप बंधन टाकले आहे. मात्र, झोपण्यापूर्वी मी थोडीशी चिक्की खाते. त्यामुळे मला चांगली झोप लागते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


शिक्षण घेत असताना मला मॉडेलिंगची आवड लागली. त्यासाठी मी प्रयत्न केले. अनेक सौंदर्यवती स्पर्धांमध्ये मी भाग घेतला. त्यात यशही मिळाले. मी ‘सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र’ची विजेती झाल्याचा खूप आनंद झाला. सध्या मी कोरिओग्राफर लवेल प्रभू यांच्याकडे शिकत आहे, तसेच मॉडेलिंगही करत आहे. आगामी काळात मला अभिनय आणि मॉडेलिंगमध्येच करिअर करायचे आहे. 

(शब्दांकन : अरुण सुर्वे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT