Five ways to keep your body fit after the age of 30 
health-fitness-wellness

वयाच्या तिशी पार केल्यानंतरही फिट राहायचंय? या पाच सवयी लवकर बदला 

सकाळ डिजिटल टीम

पुणे : वाढतं वय हे व्यक्तीच्या शरीरीवर वेगवेगळे परिणाम करत असते. तीशी ओलांडल्यानंतर माणसाच्या शरीरात पुन्हा अनेक बदल होणे सुरु होते. दरम्यान  अन्नपचन क्षमता कमी होणे सुरु होते. त्याचा परिणाम म्हणून वाढत्या वयात व्यक्ती पुर्वीसारखे उत्साही राहत नाहीत, तुलनेने लवकर थकायला लागतात. वय ३० वर्षांच्या पुढे जायला लागल्यावर शरीरावर होणारे हे वेगवेगळे परिणाम आपण व्यवस्थीत हाताळणे गरजेचे असते. प्रत्येकाने दररोजच्या दिनचर्येत अशा अनेक गोष्टी आपण करायला हव्यात, जेणेकरुन आपल्याला या बदलांशी जुळवून घेता येईल आणि तुम्हाला दिर्घ काळ तरुण आणि निरोगी राहता येईल. बरेच जण तंदरुस्त राहण्यासाठी तासनतास जीममध्ये घालवतात, शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी व्यायम हा  तेवढा एकच पर्याय आहे असे काही नाही. तुम्ही चांगले आरोग्य आणि फिट शरीर ठेवण्यासाठी जिममध्ये न जाता पुढील पाच सोपे उपाय करून देखील फिट राहू शकता. 

दररोज पुरेशी झोप घ्या

आजकालच्या धावपळीच्या जगात चांगली झोप हे अत्यंत महत्वाची आहे. रात्रभर जागे  राहणे हे शरीरासाठी घातक ठरू शकते. दुसऱ्या दिवशी पूर्णवेळ काम करण्याची उर्जा ही आपल्याला चांगल्या झोपेतूनच मिळते. त्यामुळे दिवसात सात ते नऊ तास झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

प्रमाणापेक्षा जास्त मद्य प्राशन करणे टाळा 

मद्य प्राशन करणे हा बऱ्याच लोकांच्या लाईफस्टाईलचा भाग असू शकतो, मात्र ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. स्वतःच्या चांगल्या आरोग्यासाठी मद्याच्या आहारी ना जाता त्यावर ताबा ठेवणे अत्यावश्यक आहे. तुमच्या शरीराच्या भल्यासाठी दोन ड्रिंक्सनंतर पिणे बंद कधीही योग्य असं म्हटले जाते. 

वजन आटोक्यात ठेवा

जसं तुमचं वय वाढत जातं, तसं अन्न पचन करण्याची शरीराची क्षमता कमी होत जाते. त्याचा परिणाम मग तुमचे हळूहळू वाढण्यावर होतो. वाढत्या वजनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वेळीच त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही तर मोठ्या समस्येला सामोरे जावं लागू शकतं. वाढत्या वयासोबत योग्य आहार निवडणे आणि आरोग्यदायी जीवनपध्दती निवडणे गरजेचे आहे.

सुदृढ शरीर कमवा

वजन आटोक्यात ठेवण्यासोबतच चांगले मसल कमावणे गरजेचे असते. वाढत्या वयासोबत पोषक आहार न मिळाल्याने तुमच्या आवयवांच्या हलचाली मर्यादीत व्हायला लागतात. त्या पुर्वीसारख्या व्यवस्थीत ठेवण्यासाठी दररोज व्यायम करणे आणि चांगला पोषक आहार असणे आवश्यक आहे. वय वाढण्यासोबत या गोष्टींकडं वेळीच लक्ष देणे महत्वाचे आहे.

धुम्रपान सोडा

सिगारेट, तांबाखू सारखे पदार्थांचे अतिसेवन केल्याने कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. एवढेच नाही तर त्यामुळे तुमचे ओठ आणि हाताची बोटे देखील खराब होतात, दात पिवळे होतात. धुम्रपान केल्याने तोडाला घाण वास देखील येतो. या सवयी तुमच्या आरोग्यास दररोज नुकसान पोहचवत असतात. जर तुम्ही धुम्रपान सोडू शकत नसाल तर तुमचं आरोग्य चांगलं ठेवण फार कठीण आहे. 

डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT