pills  
health-fitness-wellness

गर्भनिरोधक गोळ्या घेताना आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

गर्भनिरोधक गोळ्यांचा होतो शरीरावर विपरित परिणाम

शर्वरी जोशी

सध्याच्या काळात अनेक स्त्रिया करिअरवर जास्त फोकस करत आहेत. त्यामुळे प्रथम करिअर आणि त्यानंतर फॅमेली प्लॅनिंग असा अप्रोच काही जणींचा पाहायला मिळतो. म्हणूनच, लग्नानंतर लगेगच प्रेग्नंसी राहू नये यासाठी अनेक स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करतात. या गोळ्यांमुळे नको असलेली प्रेग्नंसी टाळली जाते. परंतु, या गोळ्या वारंवार घेतल्यामुळे त्याचा शरीरावर विपरित परिणाम होत असतो. स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये बदल होतात, मासिक पाळीचं चक्र बिघडून जातं. म्हणूनच, गर्भनिरोधक गोळ्या घेताना आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ते जाणून घेऊयात. (foods-you-should-eat-if-you-are-on-contraceptive-pills-ssj93)

दही -

सुपरफूड म्हणून दह्याकडे पाहिलं जातं. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे गर्भनिरोधक गोळी घेत असताना तुम्ही आहारात दह्याचा वापर करु शकता. दह्यामध्ये रायबोफ्लेविन असतं जे व्हिटॅमिन बी म्हणून देखील ओळखलं जातं. या व्हिटॅमिनमुळे कॅल्शिअमचं प्रमाण वाढतं. तसंच पचनक्रियादेखील सुरळीत होते. तसंच डोकेदुखी, अंगदुखी या समस्या सुद्धा दूर होतात.

२. केळी -

केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषणमूल्याचा समावेश असतो. यात व्हिटॅमिन बी ६ मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आहारात केळ्यांचा समावेश करावा. केळ्यांमुळे मूड चेंज होण्यास सुद्धा मदत मिळते. तसंच सेरोटोनिन हर्मोन्सची संख्यादेखील वाढते.

३. हिरव्या भाज्या -

स्त्रियांनी आहारात पालक,ब्रोकोली,मेथी अशा हिरव्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. हिरव्या भाज्यांमध्ये फोलेटचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते.

४.आंबट फळे -

गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना आहारात संत्री, लिंबू अशा आंबट फळांचा समावेश केला पाहिजे. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी चं मुबलक प्रमाण असतं. ज्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यावर शरीरावर त्याचे साइड इफेक्ट्स होत नाहीत.

५. सोयाबीन -

सोयाबीनमुळे शरीरातील एस्ट्रोजेनवर नियंत्रण मिळवत असतं. त्यामुळे आहारात सोयाबीन किंवा सोया मिल्कचा समावेश करावा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: पावसाचा हाहाकार अन् लोकलचा खोळंबा! मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, 'या' मार्गावर मेगाब्लॉक

Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Marathi Live Updates : सुकळी खिंडीत पाण्याचा महासागर; गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT