fruits must avoid by diabetic patients nagpur news
fruits must avoid by diabetic patients nagpur news 
health-fitness-wellness

तुम्हालाही मधुमेह आहे? मग चूकनही खाऊ नका 'ही' फळं

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मधुमेह असलेले व्यक्ती आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करू शकतात. हे शरीरासाठी चांगले देखील असते. मात्र, काही फळांना आपल्या आहारामधून आजच बाहेर काढणे गरजेचे आहे. कारण हे फळ आपल्या शरीरातील ब्लड शुगर वाढवू शकतात. त्यामुळे फळे खाताना कोणती खावी? याबाबत सतर्क असणे गरजेचे आहे. आज कोणते फळ चांगले असतात आणि कोणते वाईट याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जास्त साखर असलेले फळ खाऊ नका -
ग्लाइसेमिक इंडेक्सवरून समजते की एका जेवणामुळे व्यक्तीच्या शरीराताली शुगर लेवल कितीने वाढते. कोणत्याही फळांचा जीआय स्कोअर ७० ते १०० च्या मध्ये असेल तर ते जास्त शुगरवाले फळ असतात. टरबूज, सुखे खजूर, अननस, पिकलेली केळी इत्यादी फळे शरीरातील शुगर वाढवू शकतात.

कार्बोहायड्रेट असणारे फळे - 
आपण घेत असलेल्या कार्ब्सचे प्रमाणे आपल्या शरीरातील शुगर लेवलवर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने आहार तक्ता तयार करताना अशा पदार्थांची ओळख करून घेतली पाहिजे. 

फळांचा रस -
जेवणामध्ये किंवा इतरवेळी फळांचा रस प्यायल्यास व्यक्तीच्या शरीरातील साखर वाढू शकते. मात्र, सुखे फळ खात असल्यास साखर अवशोषित करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे खायचे असेल सुखे फळ खा.

पॅकेजिंग -
तुम्ही आहारामध्ये प्रोसेस्ड फळ घेत असाल तर आजच थांबा. आहारामध्ये ताज्या फळांचा समावेश केल्यास शरीरातील साखर बॅलेन्स राहण्यास मदत होते.

हे फळ खाऊ शकतात मधुमेही -

  • सफरचंद
  • अॅवाकॅडो
  • केळई
  • ब्लू बेरीज
  • चेरी
  • द्राक्ष
  • आंबा 
  • संत्री
  • पपई
  • बोर
  • स्ट्राबेरी
  • कीनू

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT