Calotropis Procera Medicinal Tree esakal
health-fitness-wellness

विषारी समजणाऱ्या रुईच्या झाडापासून बनवलं 'या' आजारावर औषध; प्रा. सुमेधा बनेंना मिळालं भारत सरकारकडून 'पेटंट'

कुवारबावच्या सुकन्येने बुरशीजन्य आजारावर औषध तयार केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्याकडे आढळणारी रुई ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. तिला विषारी वनस्पती म्हणून देखील ओळखली जाते.

साखरपा : कुवारबावच्या सुकन्येने बुरशीजन्य आजारावर औषध तयार केले आहे. रुईच्या विविध गुणधर्मचा वापर करत हे औषध तयार करण्यात आले. गोविंदराव निकम फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या सुमेधा प्रकाश बने यांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट प्रदान करण्यात आले आहे.

‘Calotropies Gigantea’ या औषधी वनस्पतीचा (Medicinal Tree) वापर करत त्यावर अभ्यास करीत हे औषध त्यांनी तयार केले. अध्यापनाचे कार्य करताना अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेत ही कामगिरी त्यांनी केली.

प्रामुख्याने कॅडिड संसर्ग सामान्य बुरशीजन्य संसर्ग आहे. तो वेगाने शरीरावर संसर्ग करतो. याचा प्रादुर्भाव लगेच संपूर्ण शरीरावर पसरतो. यावर तोंडाने औषध पद्धती आहे. त्याचे दुष्परिणामही आहेत. पण सुमेधा बने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अभ्यास करून ट्रान्सडर्मल औषधपद्धती शोधून काढली आहे. आपल्याकडे आढळणारी रुई ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. तिला विषारी वनस्पती म्हणून देखील ओळखली जाते.

मात्र, त्याच्या विविध गुणधर्माचा वापर करत हे औषध तयार करण्यात आले. याचा वापर करून पॅच तयार करण्यात येतात व संसर्ग झालेल्या भागावर लावले असता. हा फंगल पूर्ण बरा होतो. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचा अभ्यास आपण केला असल्याचे सुमेधा बने यांनी सांगितले. मधुमेह, लठ्ठपणा, स्टेरॉईड पद्धती, केमोथेरपी, अँटीबायोटिक, यामुळे हा संसर्ग होतो. शरीराच्या विविध भागात होतो. त्यामुळे ही औषध पद्धती यावर सोयीची ठरेल, असा विश्वास सुमेधा बने यांनी व्यक्त केला.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदिती डिके, तनुजा मिराशी, प्रणव बाईत, गौरी कदम, साक्षी पाटील या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे प्रा. अश्विनी पाटील, प्रियांका हंकारे, सुकन्या पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. अभिनव फार्मसी कॉलेजच्या प्रा. मयुरी बने-शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.

संशोधनाला मिळालेल्या यशाचा खूप आनंद होत आहे. अशाच प्रकारे आपल्याकडे असणाऱ्या विविध वनस्पतीचे संशोधन करून अभ्यास करणार. वैद्यकीय क्षेत्रात अशाच प्रकारे भरीव कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

- प्रा. सुमेधा बने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT