lasun 
health-fitness-wellness

कोरोनाला हरवायचंय? मग नियमित आहारात असा करा लसूण आणि हळदीचा वापर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सध्या सारे जग कोरोनाने धास्तावले आहे. दररोज येणारे कोरोना संक्रमितांचे आकडे आणि मृत्यू दर प्रत्येकाच्याच जीवाचा थरकाप उडवित आहे. अशावेळी लोक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणी सांगेल आणि सुचवेल, ती औषधे, काढे घेत आहेत. वारंवार सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. मास्क वापरीत आहेत. तरीही मनातली धास्ती कायमच आहे. कारण आता कामानिमित्त प्रत्येकजणच बाहेर पडतो आहे. अशावेळी पुन्हा एकदा आजीच्या बटव्याकडे वळूया. रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे अनेक पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातच आहेत. आहारात त्यांचा समावेश करुया. त्यापैकी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लसूण.

योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात लसणाचे सेवन केल्याने शरीरावर विषाणू, जिवाणू किंवा बुरशीजन्य संसर्गाचा सहज परिणाम होतं नाही.

जर रोग प्रतिकारक शक्ती बळकट असेल तर कोरोना विषाणूंचा परिणाम देखील शरीरावर कमी होणार किंवा कदाचित होणार देखील नाही. म्हणून आपल्याला दररोज आहारात योग्य प्रमाणात लसूण घेतले पाहिजे.

आपण कच्चं लसूण देखील खाऊ शकता. कच्च लसूण योग्य प्रमाणात पोटात जाण्यासाठी लसणाची चटणी करुन खावी.

लसूण आपल्या शरीरातील हानिकारक घटकांना दूर करण्याचे काम करते आणि त्याच बरोबर रक्तदाबही कमी करते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे, परंतु कमी रक्तदाब असणाऱ्यांनी लसणाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
लसणाप्रमाणेच हळद हा देखील आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

प्राचीन काळापासून भारतीय स्वयंपाकघरांमध्ये या मसाल्याचा जादुई वापर केला जात आहे. हळदी मध्ये कर्क्युमिन आहे. ते एक मजबूत रोगप्रतिकारक बूस्टर आहे. हे एंटी-इंफ्लेमेटरी, स्नायू शिथिल करणारे इ. म्हणून काम करते. संधिवात आणि ऑस्टियोआर्थरायटीससाठी चांगले कार्य करते. हळद दुध हे एक उत्कृष्ट औषध आहे. अलिकडे पाश्चात्य देशांमध्येही हे पेय टर्मरिक लॅटे नावाने लोकप्रिय झाले आहे.
कोरोना विरुद्धची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या पदार्थांचा आहारात अवश्य समावेश करावा.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

एबी डिव्हिलियर्स, ऐकतोस ना! प्लीज मला मदत कर... सूर्यकुमार यादवची आफ्रिकेच्या दिग्गजाला विनंती; म्हणाला, माझं करियर वाचव..

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

SCROLL FOR NEXT