bhujangasana 
health-fitness-wellness

Daily योग : भुजंगासन केल्यावर होतील 'या' ७ समस्या दूर

भुजंगासनामुळे करा शारीरिक व्याधींपासून सुटका

सकाळ डिजिटल टीम

शरीराच्या योग्य वाढीसाठी सकस आहारासोबत व्यायाम करणंही तितकंच गरज आहे. आजकाल प्रत्येक जण स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीम, डान्स क्लास या पाश्चात्य पद्घतीकडे वळताना दिसत आहे. परंतु, असाही एक वर्ग आहे जो योगच्या माध्यमातून मन आणि शरीर या दोघांचही स्वास्थ्य जपत आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे प्राचीन काळापासून योग करण्यावर भर दिला गेला आहे. योग करण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. विशेष म्हणजे हे योगप्रकार २ किंवा ३ नसून असंख्य आहेत. आणि, त्यांचे शरीर व मनाला होणारे फायदेदेखील तितकेच भिन्न आहेत. म्हणूनच योगासनांमधील भुजंगासन या योग प्रकाराविषयी आज आपण जाणून घेऊयात. (health-benefits-of-bhujangasana)

भुजंगासन करण्याचे फायदे -

१. श्वसनाची क्षमता वाढते.

२. पाठदुखी दूर होते आणि मणक्याचे स्नायू मोकळे होतात.

३. मासिक पाळी, गर्भाशय आणि अंडाशयाच्या समस्या दूर होतात.

४. जर भूक मंदावली असेल तर हे आसन केल्यावर भूक वाढण्यास मदत मिळते.

५. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

६. ओटीपोटातील स्नायू मोकळे होतात.

७. पोटाचे विकार दूर होतात. तसंच यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्याही कमी होण्यास मदत मिळते.

भुजंगासन कसे करावे?

प्रथम जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ रेषेत ठेवावे. यावेळी दोन्ही पायाची पावले व टाचा एकमेकांना स्पर्श करतील याची खात्री करावी. त्यानंतर हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्यावे. हाताचे कोपरे शरीराला लागून समांतर असावेत. एक दीर्घ श्वास घेऊन हळूहळू डोके, छाती, पोट उचलावं परंतु, यावेळी नाभीचा स्पर्श जमिनीवरच असू द्यावा. आता हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचा. पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत, सावकाश श्वास घेत रहा. जास्तीत जास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा. डोके मागे घेऊन हात जमिनीवर सरळ येतील असे पहा. त्यानंतर श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT