health-fitness-wellness

सतत गुळण्या करताय? अतिरेकही ठरु शकतो त्रासदायक

जाणून घ्या, गुळण्या करण्याचे फायदे-तोटे

शर्वरी जोशी

सर्दी, खोकला किंवा घशात खवखव होत असेल तर आपण गरम पाण्याने गुळण्या (gargles ) करतो. सध्याच्या काळात ते गरजेचंदेखील झालं आहे. परंतु, काही जण दिवसातून उठसूट कधीही आणि कितीही वेळ गुळण्या करतात. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं चूक आहे. काही वेळा ते तुमच्यासाठी त्रासदायकही ठरु शकतं. म्हणूनच, त्यामुळे किती वेळा गुळण्या कराव्यात, कशा पद्धतीने कराव्या. त्याचे फायदे-तोटे काय ते जाणून घेऊयात. (health benefits of gargles for throat during corona times)

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक जण सध्या वाफ घेणं, गरम पाण्याच्या गुळण्या करणं असे घरगुती उपाय करत आहेत. यामध्येच गरम पाण्याने गुळण्या केल्या तर त्याचा घशाला काहीही त्रास होणार नाही. उलट कफ व अन्य त्रास कमी होईल असा सगळ्यांचा समज आहे. मात्र, वारंवार गुळण्या केल्यामुळे घशालाही इजा पोहोचू शकते. डॉक्टरांच्या मते, गुळण्या करणं चांगली गोष्टी आहे. यामुळे घसा स्वच्छ होतो, घशाची सूज कमी होते तसंच सर्दी-पडसंही बाहेर पडतं. परंतु, त्यामुळे कोरोना बरा होतो असं कुठेही सांगण्यात आलेलं नाही. तसंच वारंवार गुळण्या केल्यामुळे त्रासही होऊ शकतो.

दिवसातून किती वेळा कराव्यात गुळण्या?

जर तुम्हाला घशाचं इन्फेक्शन झालं असेल तर दिवसातून ३ वेळा गुळण्या करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जर, तुम्ही काळजी म्हणून करत असाल तर दिवसातून केवळ दोन वेळा गुळण्या करा. यातही सकाळी नाश्ता झाल्यावर वर रात्री झोपण्यापूर्वी गुळण्या करा. दिवसातून कधीही उठसूट हा प्रयोग करु नका.

गुळण्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या

१. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्या तर त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी केवळ पाण्यानेच गुळण्या कराव्यात.

२. अनेक जण दिवसातून ३-४ वेळा गुळण्या करतात. त्यामुळे घशाला सूज येऊ शकते.

३. जास्त गरम पाणी घेतल्यास घशाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाणी वापरावं.

गुळण्या करण्याची योग्य पद्धत

१, मीठाच्या पाण्याच्या गुळण्या -

कोणताही त्रास होत नसेल आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुळण्या करत असाल तर त्या मीठाच्या पाण्याने करा. परंतु, दिवसातून केवळ २ वेळा.

२. बीटाडीनच्या पाण्याच्या गुळण्या -

जर घसा दुखत असेल, सूज असेल, इन्फेक्शन झालं असेल तर कोमट पाण्यात बीटाडीन टाकून त्या पाण्याने गुळण्या करा. बीटाडीन हे एंटीबॅक्टेरिअल औषध आहे. मात्र, हे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT