safe to wear a mask during exercise
safe to wear a mask during exercise  social media
health-fitness-wellness

Expert Advice : वर्कआऊट करतांना मास्क लावणं योग्य की अयोग्य?

शर्वरी जोशी

कोरोना विषाणूला वेळीच थांबवायचं असेल तर तीन सूत्रांचा अवलंब प्रत्येकाने केला पाहिजे. यात मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग आणि सतत हात धुणे या तीन गोष्टी आवर्जुन केल्या पाहिजेत. त्यातच कोरोना विषाणू बराच काळ हवेत तरंगत असल्यामुळे घराबाहेर पडतांना किंवा घरात एखादी व्यक्ती आली तर मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्येच वर्कआऊट करतांना (exercise) किंवा मॉर्निंग वॉक करतांनादेखील मास्क (mask) लावावा का असा प्रश्न अनेकांना पडतो. याविषयी इटलीच्या मिलान युनिव्हर्सिटी आणि मोनजिनी कार्डिओलॉजी सेंटरच्या अभ्यासकरांनी (experts-opinion) एक रिसर्च केला. त्यानुसार, मॉर्निग वॉक व वर्कआऊट करतांना मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी त्यांच्या अहवालात म्हटलं. (health is it safe to wear a mask during exercise or morning walk know experts opinion)

वर्कआऊट करतांना किंवा पार्कमध्ये वॉक करत असताना आपल्या आजूबाजूला आपल्याप्रमाणेच अनेक लोक आले असतात. सध्याच्या काळात प्रत्येक जण सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करत आहे. मात्र, व्यायाम केल्यावर किंवा वॉक केल्यानंतर आपल्या हृदयाची गती वाढते ज्यामुळे आपण श्वासदेखील जोरजोरात घेतो. श्वास जोरात घेतल्यामुळे अनेकदा आपल्या तोंडावाटे ड्रॉपलेट्सचे सूक्ष्म कण हवेत पसरत असतात आणि हेच ड्रॉपलेट्स वेगाने हवेत पसरुन त्याचा संसर्ग वाढतो.

तज्ज्ञांच्या मते, कधीही इंडोर जीम किंवा वॉक करत असला तर मास्क सक्तीने वापरा. त्यामुळे कोरोना रोखण्यास मदत मिळू शकते. विशेष म्हणजे या साठी संशोधकांनी १०० जणांवर एक प्रयोग केला. या १०० जणांना दोन गटात विभागण्यात आलं. ज्यात एका गटाला मास्क लावून वर्कआऊट करायला सांगितलं. तर, दुसऱ्या गटाला मास्कशिवाय. त्यानंतर या दोन्ही गटातील व्यक्तींचा श्वास, हृदयाची गती, रक्तदाब आणि व्यायामाचा त्यांच्या शरीरावर झालेला परिणाम तपासला. यात मास्क वापरुन वर्कआऊट करणाऱ्यांमध्ये सूक्ष्म विषाणूंचं संक्रमण मास्क न वापरणाऱ्यांच्या तुलनेत कमी होतं.

दरम्यान, मास्क वापरुन वर्कआऊट करणं जास्त सुरक्षित असल्याचं दिल्लीतील आकाश हेल्थकेअर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या डॉ. अक्षय बुद्धिराजा यांनीदेखील म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT