running 
health-fitness-wellness

धावल्यानंतर जास्त धाप लागत असल्यास वापरा 'या' सहा टिप्स

धनाजी सुर्वे

कोल्हापूर - धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे जो शरीर तंदरूस्त ठेवण्यास मदत करतो. काही लोक धावण्यास घाबरतात, कारण धावल्यानंतर धाप लागते. तसेही धावल्यानंतर धाप लागणे हे साधारण लक्षण आहे. कारण त्यावेळी ह्रदय जास्त पंपिंग होते आणि शरीराला आॅक्सीजणची जास्त गरज असते. धावताना ह्रदयाचे ठोके दीड पटीने वाढलेले असतात. कधी कधी हा अकडा शंभर ते १३० प्रती मिनिटपर्यंत पोहोचतो. यावेळी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हीही जर धाप लागण्याच्या भीतीने धावण्याचा व्यायाम करत नसाल तर घाबरू नका. आम्ही आज तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत ज्या धावताना तुमचा श्वास जास्त वेळ टिकवून ठेवतील.  

शरीराला वॉर्म अप (उबदार) करा- 
धावण्याआधी शरीराला वाॅर्म अप करा. त्यामुळे तुम्हाला धाप लागणार नाही. 

श्वास घेताणा योग्य पद्धत वापरा-
व्यायाम करताना तुमचा श्वास घेण्याची पद्धत योग्य वापरा. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. 

धावण्याआधी श्वासाचा व्यायाम करा- 
धावण्याआधी श्वासाचा व्यायाम जरूर करा. कारण पुरेसा ऑक्सिजन तुमच्या फुफ्फुसात प्रवेश करू शकेल. श्वसनाचा व्यायाम केल्याने फुफ्फुस योग्य पद्धतीने काम करते. 

तोंडाने श्वास घेऊ नका- बरेच लोक धावताना जास्त श्वास घेण्याच्या नादात तोंडाने श्वास घेतात. परंतु यामुळे तुम्ही लवकर थकता. त्यासाठी नेहमी नाकानेच श्वास घेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेताना लक्षात ठेवा की खोल आणि लांब श्वास घ्या. हे केल्यामुळे श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया योग्य प्रकारे चालते आणि तुम्ही लवकर थकणार नाही.

योग देखील फायदेशीर आहे-
धाप भरण्याचा परिणाम तुमच्या श्वास घेण्याच्या पद्धतीवर होतो. प्राणायम करून तुम्ही या समस्येपासून मोठ्या प्रमाणात मुक्त होऊ शकता. योग केल्याने श्वासोच्छ्वास वाढतो आणि धाप लागण्याचे प्रमाण कमी होते. 

धावताना थोडे चाला-
धावताना जर तुम्हाला जास्त धाप लागली तर पाच मिनिट धावला तर मध्येच एक मिट चाला आणि नंतर धावा. थोडं थांबन धावल्याने तुम्हाला कमी धाप लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT