Carrots esakal
health-fitness-wellness

जाणून घ्या; थंडीच्या दिवसांत रोज गाजर खाण्याचे फायदे

हिवाळ्यात गाजर खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात गाजर खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे.

थंडीच्या दिवसांत गाजराला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. यातून अनेक पौष्टिक घटक मिळतात. अर्धा कप गाजारातून जवळपास २५ कॅलरी मिळतात. याशिवाय ६ ग्रॅम कार्बोहायड्रेड, २ ग्रॅम फायबर, ३ ग्रॅम साखर आणि काही प्रोटिन्स असते. यामध्ये ए, के, सी, पोटॅशिअम आणि फायबर, कॅल्शिअम आयरन मिनरल्स असतात. यात असणार अॅंटी ऑक्सिडंट हे शरीरासाठी फायद्याचे असते. आज या गाजराचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

डोळ्यांसाठी फायद्याचे

गाजर हे डोळ्यांसाठी महत्वाचे आहे असे मानले जाते. यात कॅरोटीनचे प्रमाण अधिक असते. जे शरीरात जाऊन व्हिटॅमिन 'ए' मध्ये बदलते. हे डोळ्यांना स्वस्थ राहण्यासाठी मदत करते. एका संशोधनानुसार डोळ्यांना व्यक्तीच्या वयानुसार होणाऱ्या आजारांचा त्रास कमी करण्याचे काम गाजर करते.

कॅंसरचा त्रास कमी करते

कॅंसरची संभवना असेल तर ती गाजर खाल्ल्याने कमी होते. गाजरात दोन मुख्य प्रकारचे अॅंटी ऑक्सिडंट असतात. हे दोन्ही कॅंसर आजाराला थोपवण्यासाठी मदत करतात.

हृदयासाठी फायद्याचे

अनेक डॉक्टर नियमित गाजर खाण्याचा सल्ला देतात. हे शरीरासाठी फायद्याचे असते. याशिवाय गाजरामध्ये असणारे पोटॅशिअम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. गाजरात असणारे फायबर वजन नियंत्रणासाठी महत्वाचे काम करते. शिवाय हृदयाच्या आजाराच्या संभावना कमी करते. लाल गाजरामध्ये लाईकोपीन असते जे हृदयरोग रोखण्यास मदत करते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजर खाणे फायद्याचे ठरते. यामध्ये असणारे व्हिटॅमीन सी शरीरात अॅंटीबॉडीज तयार करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. व्हिटॅमीन सी शरीरातील आयरनचा योग्य ठिकाणी वापर करुन होणार त्रास कमी करण्यासाठी मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव पिकअपची धडक, सहा मेंढ्या ठार

FDA Action: एफडीएच्या कारवाईचा धसका! सीसीआयच्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित; मुंबईतील इतर क्लबसह जिमखाना प्रशासने सतर्क

Latest Marathi News Live Update : बारवी धरण ९१ टक्के भरलं; दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ब्लॉकबस्टर 'तुंबाडची मंजुळा' आता घरबसल्या पाहता येणार! कुठे आणि कधी पाहाल?

Crime News: टीव्ही पाहताना चुकून चॅनेल बदललं; पत्नीला संताप अनावर, विळा उचलला अन्... पतीसोबत धक्कादायक कृत्य घडलं

SCROLL FOR NEXT