health-fitness-wellness

Fox Nut खाण्याचे जाणून घ्या फायदे; Weight Loss साठी होते मदत

स्नेहल कदम

वजन कमी करण्यासाठी याचा वापर होतो. वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी याचे सेवन केले जाते.

प्रत्येक भारतीय घरांमध्ये खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मखाना ज्याला फॉक्सनट्स असेही म्हणतात. देशातील प्रत्येक भागात हा पदार्थ लोकप्रिय आहे. उपवासाच्या दरम्यान लोक नाश्ता म्हणून फॉक्सनट्स खातात. शरीरात एक ऊर्जा निर्माण करणारा महत्वाचा पदार्थ किंवा घटक म्हणून याकडे पाहिले जाते. उपवासाच्या दिवशीही फॉक्सनट्स (fox nuts) खाल्ल्याने ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. पण तुम्हाला माहित आहे का? की, वजन कमी करण्यासाठी याचा वापर होतो. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी याचे सेवन केले जाते.

वजन कमी करण्यासाठी

फॉक्स नट्समध्ये प्रोटीन (protein) आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. या स्त्रोतांचे अधिक प्रमाण असल्याने अनेकजन याचा डायटमध्ये समावेश करतात. प्रत्येक व्यक्तीने डाएटमध्ये याचा वापर केल्यास अधिक काळापर्यंत तुम्ही भरपेट राहू शकता. अशा प्रकारे कॅलरीज (calories) आणि वजन कमी करण्यासाठी याची मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी

फॉक्स नट्समध्ये अॅंटी ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते. यामध्ये असणारे अनेक गुण हे हृदयासाठी उपयोगी ठरतात. पचन क्रिया स्वस्थ ठेवण्यासाठी याची मदत होते. तसेच त्वचेचे आरोग्य वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी

मखाने फॉक्सनट्स प्रमाणे ग्लाइसेमिक इंडेक्स असते. रक्तपेशी कंट्रोल करण्यासाठी हे उपयोगी पडते असे अनेक संशोधनानुसार सिद्ध झाले आहे. यामुळे मधुमेह आणि डायबिटीस कमी करण्यास याची मदत होते. जर तुम्ही शुगरचे पेशंट असाल तर सकाळी उपाशीपोटी तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. यामुळे शरीर संतुलित राहते आणि शुगर (blood level control) लेवल कंट्रोल करण्यासाठी मदत होते.

हाडे मजबूत राहतात

यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. हाडे तंदुरुस्त आणि मजबूत ठेवायला याची मदत होते. तंदुरुस्त हाडे आणि दातांचे जडे अशा काही समस्यांचा तुम्हाला उद्भवत असातील, तर यापासून दूर राहण्यासाठी फॉक्सनट्सची मदत होते. त्यामुळे या व्याधींनी ग्रासलेल्या आजारी लोकांनी आहारामध्ये याचा वापर करावा.

यामध्ये असणारी पोषक तत्त्वे

सोप्या पद्धतीने पचणाऱ्या प्रोटीनचे प्रमाण यामध्ये 9.7 टक्के असते. तसेच 76 % कार्बोहाइड्रेट, 1 टक्के फॅट, 0.5 टक्के खनिजे, 0.9 टक्के फॉस्फरस आणि लोहाचे प्रमाण असते. यामध्ये काही औषधी गुणही असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT