health update Brucellosis Impotence fear in men Symptoms of brucellosis sangli sakal
health-fitness-wellness

Brucellosis : ‘ब्रुसेलोसिस’पासून सावध रहा...माणसांमध्ये नपुंसकत्वाची भीती

जनावरांना लसीकरण मोहीम सुरू; पशुवैद्यांना केलीय पीपीई किटची सक्ती

भगवान शेवडे

मांगले : दुभत्या जनावरांपासून होणाऱ्या ब्रुसेलोसिस या संसर्गजन्य आजारापासून मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या आजाराला ‘झुनोटीक डीसीस’ म्हणतात. त्याची तीव्रता वाढल्यास पशुपालकांना नपुंसकत्व येऊ शकते. या आजाराविरुद्ध आता लसीकरण मोहीम सुरू झाली असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही पीपीई किट घालूनच उपचार करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी हा आजार वारणा सहकारी दूध संघाच्या गोठ्यावरील जनावरांत आढळला होता. त्याने तीन कर्मचारी संक्रमित झाले होते. औषधोपचाराने ते बरे झाले. जिल्ह्यातील बावची गावात एका गोठ्यात दोन महिन्यांपूर्वी लागण झाली होती. शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात त्याची तपासणी केली. अकरा जनावरांना लागण झाल्याचे समोर आले. औषधोपचार केल्यानंतर आजार आटोक्यात आला. या वेळी पशुपालकांना संसर्ग झाला नव्हता.

या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने लसीकरण मोहीम राबविली आहे. लसीकरण करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीईपी किट घालणे बंधनकारक आहे, मात्र पशुपालकांत आजाराचे गांभीर्य दिसत नाही. सतत जनावरांच्या संपर्कातील शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने चार महिने ते आठ महिने वयाच्या वासरांना ब्रुसेला लस देण्यास सुरुवात केली आहे. दुभत्या जनावरांपासून ब्रुसेलॉसिस मानवाला होऊ शकतो. औषधोपचाराने तो बरा होतो, मात्र काहीवेळा गंभीर परिमाण होऊ शकतात.

जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय केंद्रामार्फत चार ते आठ महिन्यांच्या कालवडींना ब्रुसेला लसीकरण करण्यात आले. गाभण कालावधीतील तक्रारी कमी होण्याच्या दृष्टीने महत्त्‍वाची लस आहे. शिराळा वाळवा विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वंजारी, डॉ. एस. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. बी. यादव, डॉ. कुलदीप देसाई, डॉ. अमोल सपकाळ यांनी विशेष मोहीम राबवून लसीकरण केले.

ब्रुसेलोसिसची लक्षणे

जनावरांना : शेवटच्या तीन महिन्यांत गर्भपात होऊन साधे सुजणे, सांध्यामध्ये पस होणे, ताप येणे, खाणे पिणे बंद करणे. नर जनावरांत अंडकोशांना सूज येणे, पायांच्या सांध्यांवर सूज येणे

पशुपालक ः ताप, सांधेदुखी, अंगदुखी, थंडी, घाम येणे, तीव्र थकवा, डोकेदुखी

दुर्लक्ष करू नका...

जनावरांतील आजार माणसाला होऊ नये, यासाठी जनावरांतील लक्षणांवर आधी लक्ष ठेवा. जनावरांना लागण झाली अशी शक्यता वाटल्यास त्यापासून दूर राहा. इतर जनावरांना दूर ठेवा. उपचार करायचे असतील तर सुरक्षित साधणे, मास्क, पीपीई किट वापरा. माणसाला लक्षणे दिसू लागली; तर त्वरित उपचार घ्या आणि डॉक्टरांना संबंधित जनावर आजारी असल्याबाबत माहिती द्या. हा आजार उपचाराने बरा होऊ शकतो. पण, दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT