Health yoga  sakal
health-fitness-wellness

Health blog: उत्कट कोनासन

या आसनाच्या सरावाने मांडीचे स्नायू सुदृढ होतात. पायांची ताकद वाढते.गुडघे, मांड्या, ग्रोइन्स, घोटे, पोटऱ्या, पाठ हा सगळाच भाग अधिक सुदृढ होतो.

मनाली देव, योग प्रशिक्षक

उत्कट कोनासन म्हणजेच जिममध्ये जे वाइड रुकवॉटस करतात ती स्थिती. या आसनाला इंग्रजीमध्ये गॉडेस पोझ असे ही म्हणतात. हे दंडस्थितीमधील आसन आहे.

असे करावे आसन

प्रथम ताठ उभे रहावे. आता दोन्ही पावलांमधील अंतर हळूहळू वाढवावे. साधारण खांद्याच्या दुप्पट किंवा थोडे कमीजास्त पायांच्या उंचीप्रमाणे असावे.

दोन्ही पावले आता बाहेरच्या बाजूला वळवावी. टाचा आतील बाजूला असाव्यात.

त्यानंतर हळूहळू मांडी जमिनीला समांतर होईल याप्रमाणे गुडघ्यातून पाय वाकवावे. दोन्ही मांड्या जमिनीला साधारण समांतर असाव्यात.

मांडी व पोटरीमध्ये साधारण काटकोन होईल. गुडघे व घोटा हे एक सरळ रेषेत असावेत. पाठ ताठ असावी.

दोन्ही हातांच्या बोटाची ज्ञानमुद्रा करून गुडघ्यावर ठेवावी. नजर स्थिर व श्‍वसन संथ सुरू असावे.

शक्य तेवढा वेळ आसन टिकवावे. आसन सावकाश सोडावे व सरळ उभे राहून पायांना आराम द्यावा.

आसनाचे फायदे

या आसनाच्या सरावाने मांडीचे स्नायू सुदृढ होतात. पायांची ताकद वाढते.

गुडघे, मांड्या, ग्रोइन्स, घोटे, पोटऱ्या, पाठ हा सगळाच भाग अधिक सुदृढ होतो.

अनेक मुलांचे पाय थोडेसे चालल्यावर किंवा थोडासा व्यायाम केल्यावर लगेच दुखू लागतात. अशा मुलांना या आसनाचा नियमित सराव करून पायांची ताकद वाढविणे आवश्‍यक आहे. तसेच विविध खेळाडूंनासुद्धा या आसनाचा छान लाभ होतो.

गुडघेदुखी, लिगामेंटचा त्रास असेल, खूप स्थूलपणा असतील तर हे आसन करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT