home remedies for eye syndrome nagpur news 
health-fitness-wellness

डोळ्यांमध्ये जळजळ होण्यापासून तर सूजन येणे सर्व समस्यांवर रामबाण उपाय, ट्राय करा 'हे' घरगुती नुक्से

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आपल्यापैकी अनेकजण डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त असतात. डोळ्यांमध्ये जळजळ होणे, खाज येणे, डोळे सुजणे, डोळ्यांच्या जवळ किंवा आतमध्ये चिकट पदार्थ जमा होणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांनी कमी दिसणे अशा एक ना अनेक समस्या असतात. डोळ्यातील पाणी कमी झाल्यामुळे या समस्या उद्धभवतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मात्र, घरगुती उपायामुळे देखील या समस्या चटकन दूर होतात.

सूती कापडाने शेकणे -
एक मुलायम सूती कपडा घेऊन त्याला गरम पाण्यात भिजवा. बाहेर काढून त्याला कोरडा करा. डोळे बंद करून पाच मिनिटे डोळ्यांवर ठेवा. त्यानंतर तोच कापड हळूहळू डोळ्यावर फिरवा. त्यामुळे डोळ्यामधील जमा झालेला कचरा बाहेर निघून डोळे स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच या उपायामुळे डोळ्यांना लुब्रिकेशन देखील मिळेल. तसेच डोळ्यांमध्ये होणारी जळजळ आणि डोळे लाल होण्यापासून सुटका मिळेल.

गाजराचा ज्युस -
तुमच्या डोळ्यांना प्रकाशाचा त्रास होत असेल. तसेच तुम्हाला खूप कमी दिसत असले तर गाजर हे रामबाण उपाय आहे. कारण गाजरामध्ये 'अ' जीवनसत्व असते. दररोज गाजराचे सेवन केल्यास डोळ्यांचे सर्वच आजार दूर होतात. तुम्हाला गाजर खायचा कंटाळा येत असेल तर त्याचे ज्युस करून पण पिऊ शकता. नियमित ३ महिने हे गाजराचे ज्युस प्यायल्यास चष्मा देखील सुटतो.

नारळाचे तेल -
नारळाच्या तेलाचा डोळ्यांना खूप मोठा फायदा होतो. हे तेल डोळ्यांना ड्राय होण्यापासून वाचवितात. दोन कापसाचे गोळे घेऊन त्यांना नारळाच्या तेलामध्ये बुडवून ठेवा. त्यानंतर १५ मिनिटांपर्यंत दोन्ही डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर होईल.

न्यूट्रिशन सप्लिमेंट्स -
ओमेगा ३ फॅटी अ‌ॅसिड असलेले खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने डोळे ड्राय होत नाही. तसेच ड्राय झालेले डोळ्यांमध्येही लुब्रिकेशन येण्यास मदत होते. सैल्मन, सर्डीन हे मासे, जवसाचे तेल, अक्रोड यांसारख्या पदार्थांमध्ये ओमेगा ३ हे फॅटी अ‌ॅसिड मुबलक प्रमाणात असते. या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास डोळ्यांची सूजन कमी होण्यास मदत होते.

अ‌ॅलोविरा जेल -
डोळ्यांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी अ‌ॅलोविरा जेल हा एक महत्वाचा उपाय आहे. यामध्ये मॉश्चिराईज गुण असतात. त्यामुळे डोळ्यांचा लालसरपणा आणि सूजन कमी होण्यास मदत होते. अ‌ॅलोविराचे एक पान घेऊन त्याचे जेल काढा. एका लहान टिश्यूवर हे जेल घेऊन डोळ्यांवर लावा. १० मिनिटांनंतर डोळे कोमट पाण्यानी धुवा. हा उपाय दिवसातून दोनवेळा केल्यानंतर चांगला फायदा होतो.

गुलाब जल -
डोळे थकलेले किंवा सूजलेले असतील तर गुलाबजल हा रामबाण उपाय आहे. यामध्ये जीवनसत्व 'अ' असते. त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. दोन कापसाचे बोळे घेऊन गुलाबजलमध्ये भिजवा. त्यानंतर हळूहळू डोळ्यांची मालिश करा. १० मनिटानंतर डोळे थंड्या पाण्यानी धुवा. तुम्हाला लवकर आराम पाहिजे असल्यास थोडेस गुलाबजल डोळ्यात पण घालू शकता. मात्र, ते अगदी शुद्ध असायला हवे. एका दिवसात तीनवेळा हा उपाय केल्यास चांगला फायदा होतो.

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'जैश-ए-मोहम्मद'चे तीन दहशतवादी भारतात घुसले; बिहार पोलिसांकडून हाय अलर्ट जारी, तिघंही आहेत पाकिस्तानी

Latest Marathi News Updates : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; गावांचा संपर्क तुटला, शेती पाण्याखाली

AAI Recruitment 2025: परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी! एअरपोर्ट प्राधिकरणात मेगा भरती सुरू; जाणून घ्या अर्ज कसा करावा?

Gmail Delete : मेल बॉक्स फूल झालाय? नको असणारे हजारो ईमेल डिलीट करा एका क्लिकवर..

VIDEO: जॅकलिनला पार्थ पवारने दिले लालबागच्या राजाचरणी अर्पण करायला पैसे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल,

SCROLL FOR NEXT