home remedies for gout patients nagpur health news 
health-fitness-wellness

संधीवातापासून त्रस्त आहात? मग घरच्या घरी 'हे' उपाय करा अन् राहा तंदुरुस्त

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : जुन्या ऑस्टिओआर्थराइटिससारखे दुखणारा संधीवात हा एक आजार आहे. यामध्ये थोडा फरक आहे. रक्तामध्ये यूरीक अॅसिड जमा झाल्यामुळे हा आजार होतो. यूरीक अॅसिड जॉईंटमध्ये जमा होते. त्यामुळे सूज येऊन दुखतंय. आपले शरीर प्युरीन रसायन तोडते त्यावेळी युरीक अॅसिड तयार होत असते. हे आपल्या रक्तामध्ये मिसळून किडनीमधून मूत्रपिंडाद्वारे बाहेर टाकले जाते. यूरिक अॅसिडला वेळीच नियंत्रित न केल्यास संधीवात होऊ शकतो.

युरीक अॅसिड रोखण्यासाठी घरगुती उपाय - 


चेरी आंबट, गोड, लाल, काळ्या रंगामध्ये सर्वांना आवडते. हीच चेरी म्हणजे यूरीक अॅसिड रोखण्यासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे संधीवाताच त्रास होत नाही.

मॅग्नेशिअम -
संशोधनानुसार मॅग्नेशिअम हे यूरीक अॅसिड कमी करून हेल्दी शरीर ठेवण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने संधीवाताचा धोका कमी असतो.

आलं -
इंफ्लेमेटरी स्थितीसाठी आलं जडीबुटीचं काम करते. आलं हे संधीवातावर प्रभावी मानले जाते. त्यामुळे दुखणे कमी होते. तसेच यूरीक अॅसिडचा स्तर कमी करण्यास देखील आलं मदत करते. 

व्हिनेगर, लिंबाचा रस अन् हळद -
अॅपल सायडर व्हिनेगर, लिंबाचा रस आणि हळद हे संधीवातासाठी गुणकारी माले जाते. कोणताही अभ्यास व्हिनेगारची पुष्टी करत नाही. मात्र, ते लिंबाच्या रसासोबत घेतल्यास फायदा मिळतो. 

ओवा -
लघवीसंबंधी आजारांवर रामबाण उपाय म्हणजे ओवा. त्यामुळे प्रत्येक घरी ओवा असतोच. हाच ओवा हा संधीवातामधील सूजना कमी करण्यास फायदेशीर ठरतो.

दूध थीस्ल बीयाणे -
हे एक जडीबुटी असून त्याचा उपयोग लिवर तंदुरुस्त राहण्यासाठी केला जातो. हे युरीक अॅसिड कमी करण्यासा मदत करते. त्यामुळे संधीवात होत नाही.

सफरचंद -
संधीवात कमी करायचा असेल तर आहारामध्ये सफरचंदचा वापर करा. यामध्ये मॅलिक अॅसिड असते. तसे फ्रुक्टोज देखील असते. त्यामुळे संधीवाता धोका कमी असतो. 

केळी -
संधीवातामध्ये केळी खाणे चांगले आहे. यामध्ये पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पेशींच्या वाढीसाठी लाभदायक ठरते. यामध्ये फ्रुक्टोज देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे संधीवातावर प्रभावी ठरते. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT