health-fitness-wellness

गृहिणींमध्ये वाढतोय मानसिक तणाव, आनंदी राहण्यासाठी या 5 टिप्स

गृहिणींनी आनंदी राहायला हवे

सकाळ डिजिटल टीम

पूर्ण घराला, घरातल्या सदस्यांना काय हवं काय नको ते बघण्याचं काम गृहिणी अगदी चोखपणे करतात. प्रसंगी त्यांना त्यांच्या इच्छेला मुरड घालावी लागते. तर कधी घरच्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो. कोरोना काळत सगळेच घरात असल्याने गृहिणींचा ताण खूपच वाढला. त्यांना स्वतःसाठी मिळणारा वेळही मिळाला नाही. अशा अनेक घटनांमुळे त्याच्यावर मानसिक तणाव वाढतो आहे. याबाबात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट प्रज्ञा मलिक म्हणतात की, वेगवेगळ्या कारणांमुळे गृहिणींचा तणाव वाढतो. त्या एकट्या राहायला लागतात. आपल्याला कोणी विचारत नाहीत असेही त्यांना वाटायला लागते. हा तणाव कमी करून गृहिणींनी आनंदी राहायला हवे, यासाठी काही गोष्टी फॉलो केल्या तर त्या नक्कीच आनंदी होतील.

Stress

आपली आवड जपा - गृहिणी रोजच्या कामाच्या नादात आपल्या आवडी-निवडी विसरतात. मानसिक तणाव यायला लागला की टेन्शनपेक्षा आपली आवड जपण्याकडे लक्ष द्या. यामुळे तुम्हाला तुमचा आनंद पुन्हा सापडेल. तुम्ही तुमच्या आनंदाचा विचार केलात तर मानसिक अस्वस्थता दूर होण्यास मदत होईल.

नेमकं कारण शोधा - तुम्हाला अस्वस्थ कशामुळे वाटतंय याचे नेमके कारण शोधा. ते कळल्यावर प्रश्न कसा सोडवायचा यासाठी प्रयत्न करा. घरातल्यांशी चर्चा करा. यामुळे तुमचे प्रश्न सोडवायला मदत मिळू शकते.

मैत्रिणींशी बोला - घरच्या जबाबदाऱ्यांमुळे आपण मित्र-मैत्रीणींना वेळ देऊ शकत नाही. रेग्युलर बोलणेही होत नाही अशावेळी थोडा वेळ मित्र-मैत्रिणींबरोबर घालवलात तर थोडा दिलासा मिळेल. तुम्ही नव्या मैत्रीणीही जोडू शकता. थोडासा वेळ त्यांच्याबरोबर घालवल्याने तणाव कमी होण्यास मदत होईल.

स्वतःसाठी वेळ काढा - स्वतःसाठी वेळ काढणेही खूप महत्वाचं आहे. दिवसातले 2 ते 3 तास तुम्हाला यासाठी मिळू शकता. अशावेळी नव्या गोष्टी शिका, फिरायला जा... नवी रेसिपी करा... तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ द्या. हा आनंद तुम्हाला खूप काही देणारा असेल.

काही गोष्टी परिस्थितीवर सोडा - काही वेळा एखादी समस्या सुटण्यासाठी वेळ लागू शकतो. मार्ग मिळत नाही. अशावेळी त्यावर विचार करत बसण्यापेक्षा किंवा टेन्शन घेण्यापेक्षा तो प्रश्न सोडविण्यासाठी थोडा वेळ द्या. त्या काळात थोडा विचार करा. पण तणाव न घेता सोपा आणि पॉझिटिव्ह विचार करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Rule: शाळेच्या ५० मीटरच्या आत जंक फूडला बंदी; FSSAI परवाना सक्तीचा, महाराष्ट्रात शाळा, वसतिगृह, कँटीनसाठी नवे नियम

Achalbet Guru Pournima: अचलबेट तीर्थक्षेत्रात गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य गोल रिंगण; पाच पालख्यांच्या संगमाने तुकाई परिसर दुमदुमला

Pune Civic Tender Row: पुणे महापालिकेच्या झाडणकाम निविदेवर अडीच तास खडाजंगी; नगरसेवकांच्या प्रश्नांवर ‘झाडू’, नाराज सदस्यांचा सभात्याग

Live Marathi News Update : CISF ने १० व्या रिझर्व्ह बटालियन, बेंगळुरूची निवड आपल्या 'महिला QRT प्रशिक्षण केंद्र' म्हणून केली

Khutbav Robbery Plot Foiled: खुटबावमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या सापळ्यात; पाच जेरबंद

SCROLL FOR NEXT