health tips wrinkles 
health-fitness-wellness

चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या कशा घालवाल? जाणून घ्या घरगुती उपाय

सकाळ वृत्तसेवा

अनेकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. त्यामुळे सुंदर असलेला चेहरा खराब दिसायला लागतो. मात्र, तुमच्या स्वयंपाक घरात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा उपयोग करुन करुन तुम्ही चेहऱ्यावरील रेषा आणि सुरकुत्या दूर करु शकता...

- अंड्याच्या पांढऱ्या भागात एक चमचा लिंबूचा रस मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 20 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुऊन घ्या. याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होत जातील.

- एक चमचा कॉफी पाऊडर, एक चमचा दूध आणि एक चमचा मध यांचे मिश्रण करा. तयार झालेला लेप चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटानंतर साफ पाण्याने चेहरा धुऊन घ्या.

- एक चमचा साखरेमध्ये एक चमचा मध मिसळून लेप तयार करुन घ्या. या लेपाने चेहरा स्क्रब करा आणि 10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. 

- डार्क चॉकलेट चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. डार्क चॉकलेट वितळवून चेहऱ्यावर लावा, त्यानंतर 10 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा साफ करा.  

- एका केळीला चांगल्या पद्धतीने मेश करुन घ्या. त्यात एक चमचा ऑलिव तेल टाका. या मिश्रणाला चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. 

- सफरचंदचा सिरका आणि मधाचे मिश्रण करुन चेहरा आणि मानेला लावा. त्यानंतर 10-15 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

- एक चमचा कोरफडाच्या चिकट भागात अंड्याचा पांढरा भाग मिसळा. तयार झालेल्या मिश्रणाने चेहऱ्याची मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

- ग्रीन-टी अँटी ऑक्सिडेंट म्हणून काम करते. दररोज ग्रीन-टी मध्ये एक चमचा मध टाकून पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : लग्न जुळत नसल्याने युवकाने संपवलं जीवन

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT