health-fitness-wellness

वृद्धांविषयी नवीन रिपोर्ट; ताप नसतानाही होऊ शकतो कोरोना?

सकाळ डिजिटल टीम

वर्षभरापूर्वी कोरोनाने देशात शिरकाव केला आणि त्यातच त्याची दुसरी लाटदेखील आली. या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असून या लाटेचा सर्वाधिक फटका तरुणवर्ग व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. कोरोनाची सर्वसाधारण लक्षणे दुसऱ्या लाटेतदेखील दिसून येत आहेत. यामध्येच ताप हे महत्त्वाच्या लक्षणांपैकी एक मानलं जातं. परंतु, अनेक ज्येष्ठ नागरिकांना ताप नसतांनादेखील त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सध्या याविषयी नवीन संशोधन सुरु असून वृद्धांमधील कोविडची लक्षण नेमकी कशी ओळखायची हा नवा प्रश्न समोर उभा राहिला आहे. परंतु, प्लस ऑक्सिमीटरच्या माध्यमातून वृद्धांमधील कोविडचं संक्रमण ओळखता येऊ शकतं.(how to identify covid 19 in older adults check out what new study has-revealed)

अमेरिकेच्या वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅथरिन वान सोन आणि डेबोरा इती यांनी एक नवा रिपोर्ट तयार केला आहे. त्यानुसार,वृद्ध व्यक्तींच्या शरीराचं तापमान तपासण्यासाठी प्लस ऑक्सिमीटरचा वापर करता येऊ शकतो. हा रिपोर्ट मेडिकल जर्नल फ्रंटिअर्स इन मेडिसीनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

प्रकाशित झालेल्या नव्या रिपोर्टनुसार, ३० टक्के वृद्धांमध्ये कोरोनाची अन्य लक्षणे दिसून आली. मात्र, त्यांच्यात ताप अजिबात दिसला नाही. त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये वृद्धांची ऑक्सिजनची पातळी तपासणं गरजेचं असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे.

ऑक्सिमीटर लावतांना घ्या 'ही' काळजी

१. ऑक्सिमीटरवर बोट ठेवतांना अलगद ठेवा.

२. रिडिंग स्थिर होईपर्यंत बोट ऑक्सिमीटरमधून काढू नका.

३. नेलपॉलिश लावून ऑक्सिमीटरवर बोट ठेवू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT