Mosquito 
health-fitness-wellness

म्हणून 'या' लोकांना डास जास्त चावतात; काय संबंध आहे रक्तगटाशी, ते जाणून घ्याच

सुस्मिता वडतिले

पुणे : पावसाळ्यात सर्वत्रच डास मोठ्या प्रमाणात दिसून येतात. घराबाहेर, रस्त्यावर आणि आडरानात ये जा करताना डासांचा कळप आपल्या डोक्यावर फिरू लागतो. डास हे उद्याने, मैदान आणि अगदी घरीसुद्धा आपला पाठपुरावा करणं सोडत नाहीत. त्यावेळी लाखो प्रयत्नानंतरही त्यांच्यापासून सुटका करणे कठीण होते. आपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, काही लोकांनाच डास अधिक त्रास देतात. यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत.

शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, माणसांना फक्त मादी डासच चावतात. याचे कारण मादी पुनरुत्पादनाशी संबंधित आहे. खरं तर मादी डास मानवी रक्तात असलेले पोषक आहार घेतल्यानंतरच अंडी देतात. 
 
डासांना कार्बन डाय ऑक्साईडचा वास देखील माणसांकडे वेगाने आकर्षित करतो. मादी डास त्याच्या संवेदनाक्षम जीवांसह त्याचा वास शोधतो. मानवी शरीरातून श्वास बाहेर टाकताना सीओ 2 वायू बाहेर पडल्यामुळे डास काही लोकांना चावतात. 150 फूट अंतरावरुन देखील डासांना त्याचा वास अगदी सहजपणे सापडतो.

संशोधकांचा असा दावा आहे की, काही वास डासांना अधिक वेगाने आकर्षित करतात. मानवी त्वचेमध्ये राहणा-या बॅक्टेरियातून सोडल्या जाणार्‍या युरिक  अॅसिड, लॅक्टिक अॅसिड आणि अमोनियाच्या गंधापेक्षा डास मानवांच्या जवळपास फिरतात. शरीराच्या तापमानामुळे, हे घटक एखाद्या व्यक्तीच्या घामामध्ये सोडले जातात. 

जपानमधील संशोधकांनी हे सिद्ध केले आहे की, डास हे 'ए' रक्तगटापेक्षा 'ओ' रक्तगटाच्या लोकांना अधिक चावतात. या रक्तगटाचे लोक डासांच्या चुंबकांसारखे काम करतात. तर 'बी' रक्तगटाच्या लोकांना डास सामान्यत: च कमी प्रमाणात चावतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

SCROLL FOR NEXT