health-fitness-wellness

रानभाज्या खा अन् रोगप्रतिकार शक्ती वाढवा...

पोहाळे, जोतिबा परिसरात २५ हून अधिक प्रकारच्या रानभाज्या

निवास मोटे

जोतिबा डोंगर : जून जुलै महिन्यात दरवर्षी डोंगरपठार जंगलात तसेच शिवारात आपोआपच नैसर्गिक पद्धतीने रानभाज्या उगवतात. या रानभाज्या आपल्या शरिरात रोगप्रतिकार (immunity power) शक्ती वाढवितात. या खाल्या की विविध आजारापासून मुक्ती मिळते. आपल्या पूर्वजांना या रानभाज्याची सखोल माहिती होती पण अलीकडच्या काळातील पिढीला मात्र या रानभाज्याची माहिती नाही. दोन तीन वर्षापासुन मात्र या रान भाज्यांची ओळख कोल्हापुरातील (kolhapur update) निसर्गमित्र संस्थेने करून दिली आणि या रानभाज्यांना महत्व आले.

सध्या तर जिल्ह्यात कोरोनाने (covid -19) थैमान घातल्यामुळे या औषधी असणाऱ्या रानभाज्यांना आता मोठे महत्त्व आले असून या भाजीची चव चाखण्यासाठी आता डोंगर पठारावर गर्दी होऊ लागली आहे. जोतिबा डोंगर पोहाळे तर्फ आळते कुशिरे तर्फ ठाणे गिरोली दाणेवाडी ता. पन्हाळा या भागातील डोंगर पठार व शिवारामध्ये पंचवीसहुन अधिक प्रकारच्या रानभाज्या सापडतात. या भागातील शेतकरी ग्रामस्थ त्यांच्याकडे तण म्हणून पहात होते. त्यांना काढून फेकत . कित्येक वर्षांपासून या भाज्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होते पण पण दोन-तीन वर्षापासून मात्र या भाज्यांची ओळख ग्रामस्थांनी करून घेतली आहे.

आपल्या आहारात या रानभाज्याचा वापर आरोग्यासाठी हे ग्रामस्थ सध्या करू लागले आहेत. या भागांमध्ये भारंगी मोरशेंड गुळवेल टाकाळा पाथरी तेरडा केना घोळी अंबुशी आघाडा हादगा कुर्डू काटेमाठ रानमोहर फांजिरा या प्रकारच्या २५ हून अधिक भाज्या सापडतात. कोल्हापुरातील काही निसर्गप्रेमी व भाज्यांची ओळख असणारे काही पर्यटक दर रविवारी किंवा सुट्टीदिवशी या डोंगर पठाराला भेट देऊन या रानभाज्या घेऊन जातात. दरम्यान, शेती किंवा निगा न करता नैसर्गिक उगवलेल्या भाज्या यांना रान भाज्या असे म्हणतात.

मुख्य करून या भाज्या जंगल डोंगर-पठार शेतातील बांध किंवा माळरानाच्या परिसरात सापडतात. या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असून त्या आहारात भाजी करून खातात. पूर्वीपासून आदिवासी बांधव या भाज्यांचा आहारात वापर करताना दिसत आहेत. शहरात या भाज्यांचा फारसा संबंध येत नाही परंतु ग्रामीण भागातील डोंगर पठारावर या भाज्या सर्रास सापडतात.सध्या या डोंगर पठारावर रान भाज्यांच्या शोधासाठी निसर्गमित्र, शेतकरी, तरूण वर्ग फिरू लागले आहेत. पोहाळे जोतिबा परिसरात रानभाज्यांचा खजिना आहे. या रानभाज्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असून त्या औषधी गुणधर्माच्या आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी या रानभाज्यांचा वापर आपल्या रोजच्या आहारात करत आहेत.

"दोन तीन वर्षापूर्वी निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी आमच्या भागातील रान भाज्यांची माहिती दिली. तेव्हापासून आम्ही या रान भाज्या खाऊ लागलो आहे. त्या फार चविष्ठ व औषधी गुणधर्माच्या आहेत. सध्या कोरोना संसर्गामुळे तर या रान भाज्याचे महत्व वाढले आहे."

- सूरेश बेनाडे, पोहाळे तर्फ आळते, निसर्ग मित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT