sadguru-isha-foundation 
health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : आनंदाचे विधान... 

सद्गुरू, ईशा फाउंडेशन

आध्यात्मिक प्रक्रियेची मूलभूत गोष्ट एवढीच आहे, तुम्ही इथे असे जगता जणूकाही फक्त तुम्ही एकटेच अस्तित्वात आहात. दुसरं कोणीच नाही फक्त तुम्ही. कारण प्रत्येकाला तुम्ही तुमचाच एक अविभाज्य अंग म्हणून पाहता आणि म्हणून काहीच समस्या नाही. लोकं मला विचारतात, ‘सद्‍गुरू, तुम्ही जिथे कुठे जाता, मग तिथे दहा हजार किंवा लाखभर लोकं असोत, सगळ्यांशी तुम्ही कसा काय संवाद साधता?’ बरं, मी त्यांच्याशी असे बोलतो जणूकाही मी स्वतःशीच बोलत असेन. मला तशी सवय असती तर? 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तिथे ‘मी’ किंवा ‘तुम्ही’ असं काही नाहीये. असं म्हणून मी शब्दांची करामत किंवा प्रवचन देत नाही आहे. मी फक्त सहज बोलत आहे, जणू काही मी स्वतःशीच बोलतो आहे, कारण मला माझ्याशिवाय इतर कोणीच दिसत नाही. आध्यात्मिक प्रक्रियेचा अर्थच मुळात असा आहे की; काही ना काही मार्गाने, तुमच्या अनुभवात, तुम्ही सर्वांना तुमच्या आत सामावून घेतलं आहे. तुलना आणि स्पर्धा तुमच्या आयुष्यातून आता नाहीशा झाल्यात. नाहीतर सुरुवातीला जी एक साधी तुलना म्हणून सुरवात होते, कालांतराने तीच एका स्पर्धेमध्ये रूपांतरित होते आणि नंतर ती फार कुरूप होते. तुलना आणि स्पर्धा असते, तिथं सुंदर आणि आनंदी वातावरणही कुरूप होतं. आनंद हा तुमच्या जीवनातला महत्त्वाचा पैलू आहे. आनंद म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा तुमचा अनुभव विलक्षण आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही सर्वसमावेशक असल्यावर तुमच्या अस्तित्वाचा तुमचा अनुभव सुंदर बनतो आणि म्हणूनच तुम्ही आनंदी आहात. कुणीतरी मला स्वयंपाकाबद्दल प्रश्‍न विचारला, ‘छान स्वयंपाक करून मी कुणाला आनंदी करू शकेन का?’ हे पाहा, आता मी आनंदी आहे कारण मी सर्वोत्तम डोसा बनवतो म्हणून नाही किंवा मी इतरांपेक्षा चांगला डोसा बनवतो म्हणून नाही किंवा तुम्ही बनवलेला सर्वोत्तम स्वयंपाक खाऊन मी अधिक आनंदी होणार नाही. अगदी तुमच्या उपाहारगृहात येण्याआधीच मी खूप आनंदी असेन. तुम्ही काही चांगलं बनवलंत, तर मी ते आनंदानं खाईन. तुम्ही काही खराब बनवलंत, ते सुद्धा अतिशय आनंदानं मी ते बाजूला सारीन. तुमच्या चांगल्या स्वयंपाकामुळं किंवा खराब स्वयंपाकामुळं तुम्ही मला आनंद देऊ शकत नाही किंवा माझा आनंद हिरावू शकत नाही. मला तुम्ही आणि जगातील प्रत्येकानं असं व्हावं अशी माझी इच्छा आहे, की तुमच्या आत काय घडतं हे दुसरं कोणीही ठरवू शकत नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT