Knee pain can be reduced by taking measures with the advice of an expert doctor 
health-fitness-wellness

घुडघ्यांना असं जपा नाही तर सहन करावा लागतो 'हा' त्रास....

सकाळवृत्तसेवा

मैलोनमैल धावणं असो की एखादा नवा डान्स करून पाहणं असो, गुडघ्यांशिवाय काहीच करता येत नाही. प्रत्येक हालचालीची धुरा गुडघ्यांवर असते. गुडघेदुखीचा त्रास सर्वच वयात जाणवत असला तरी वाढत्या वयासोबत हा त्रास वाढत जातो. गुडघीदुखीमुळे मांडी घालून बसणे, पाय दुमडुन बसणे या हालचाली त्रासदायक होतात. तसेच गुडघेदुखी जास्त जाणवते ती जिने चढताना व उतरताना किंवा खाली बसल्यावर उठताना. वेळीच योग्य ती काळजी व तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपाययोजना केली तर गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

गुडघेदुखीची कारणे

स्थुलतेचे वाढणारे प्रमाण, गुडघ्यावर अतिभार टाकणाऱ्या क्रिया, वयोमानानुसार होणाची हाडांची झीज, पुर्ण दिवस उभ्याने काम करणाच्या सवयीमुळे गुडघ्यांच्या हालचालींना न मिळणारा वाव, चुकीची व्यायाम पद्धत, वजन वाहण्याचे काम

वाचा - लई भारी ! टेम्पो चालकचा मुलगा झाला भारतीय हवाई दलात गरुड कमांडो...

हे आवर्जुन करा...

  • उंच टाचांच्या चपला वापरणे टाळा
  • चालताना काठीचा वापर करा. त्यामुळे काही भाग गुडघ्यांऐवजी काठीवर निभावला जाईल.
  • वजन नियंत्रित ठेवा.
  • गुडघेदुखीवर व्यायाम हा उत्तम उपाय आहे. व्यायामामुळे स्नायु अधिक बळकट होतात. सांधे लवचिक होतात.
  • गुडघ्यांचे व्यायाम हे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार करावे.
  • गुडघेदुखीसाठी भार रहित व्यायाम करावे. जसे की खुर्चीवर बसून पाय सरळ वर खाली करणे. हे दिवसातून चार पाच वेळा करावे.
  • व्यायामामुळे गुडघ्याभोवतालच्या स्नायुंना बळकटी येते.

आहारात हे करा

  • आहारात कॅल्शियम व ड जीवनसत्वाचे प्रमाण योग्य असणे आवश्‍यक आहे.
  • दुध - दह्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. सोयाबीनचे पदार्थ खा. आहारात अंड्याचा समावेश करा.


गुडघेदुखी टाळण्यासाठी मॉंर्निग वॉकला जाणे फायदेशीर परंतू सध्या लॉकडाऊनमुळे जाता येणे शक्‍य नाही. त्यामुळे घरच्याघरी जमतील तेवढे व्यायाम करा. सपाट पृष्ठभागावर चाला. वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
- डॉ. राहुल बडे, अस्थिरोगतज्ज्ञ  

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT