Raveena Tandon DIet Plan- the secret of looking young esakal
health-fitness-wellness

Diet Plan: वयाच्या पन्नाशीत ३० वर्षांचं कसं दिसावं ? रवीना टंडनचं डाएट सीक्रेट एकदा वाचाच

जाणून घेऊया रवीनाचा सीक्रेट डाएट प्लान ज्याने तुमचं वाढतं वय लोकांच्या लक्षात येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

रवीना टंडन बॉलीवुडमधील ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या चित्रपटातील डान्सची आजही चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. रवीना वयाच्या ४७ वर्षात पदार्पण करत असली ती आजही ३० वर्षांच्या तरूण अभिनेत्रींना मागे टाकते. तिची फिगर आणि फिटनेस बघून अनेकांना तिचा डाएट प्लान नक्कीच जाणून घ्यावासा वाटतो. जाणून घेऊया रवीनाचा सीक्रेट डाएट प्लान ज्याने तुमचं वाढतं वय लोकांच्या लक्षात येणार नाही. (Raveena Tandon DIet Plan- the secret of looking young)

रवीना एका मुलाखतीत म्हणाली होती की तिला मुलांवर घराच्या छतावर जाऊन वर्कआऊट करायला आवडतं. रवीना वर्क आऊट करण्यासाठी जिमला कधीच जात नाही. याव्यतिरीक्त रवीना भरपूर फळे आणि प्रोबायोटिक्स घेते. (Diet Plan)

रवीना टंडनने सांगितले की ती दही आहारात घेते. दह्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, लॅक्टिक अॅसिड आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं. हे तत्व स्किनचं कोलेजन वाढवण्यात मदत करते. तसेच दही आणि फळे इम्यूनिटी आणि मेटाबोलिजम बूस्ट करण्यास मदत करते.

जाणून घ्या दैनंदिन डाएट

रवीनाला खूप साऱ्या पदार्थांच मिश्रण करून खायला आवडते. तिच्या डेली डाएटमध्ये वरण, भाजी, पोळी आणि दही यांचा समावेश असतो. रवीनाला दही फार आवडते. दही पोटाला थंड ठेवण्यास मदत करते आणि पचनशक्ती वाढवते.

सीक्रेट काढा

रवीनाने तिच्या सीक्रेट होममेड काढ्याची रेसिपी शेअर केली होती. हा काढा रवीनाने लॉकडाऊनमध्ये पिण्यास सुरूवात केली होती. या काढ्यामध्ये रवीना तिच्या घरच्या फार्ममधील हळद, लवंग, आलं, काले मिरे, जीरे आणि थोड्या तुपाचा ती वापर करत होती. या काढ्यामुळे तिचं वजनही कंट्रोलमध्ये राहातं.

स्विमिंग

रवीनाला स्विमिंग, योगा आणि कार्डिओ करण्याची आवड आहे. सोशल मीडियावर रवीनाने योगाचे भरपूर व्हिडिओही शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध'; शेतकऱ्यांकडून रास्तारोको, उपकाराची भाषा थांबवावी

दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय! परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात आता सीसीटीव्ही असणार, शाळेची संरक्षक भिंत पक्की असण्याचीही घातली अट

Inspiring Woman: 'पोटात वाढणाऱ्या बाळासह राधिका नरळेंची प्रेरणादायी धाव'; सोलापूरमधील ‘१० के रन’ मॅरेथॉनमध्ये गरोदर असूनही ५ किलोमीटर धावल्या..

Panchang 3 November 2025: आजच्या दिवशी चंद्रकवच स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Laxman Hake: दोन सप्टेबरचा जीआर रद्द करा: लक्ष्मण हाके; आरक्षणाशी संबंध नसणारे विखे उपसमितीचे अध्यक्ष कसे?, दहा टक्क्यांना सरकार घाबरले

SCROLL FOR NEXT