sweating 
health-fitness-wellness

घामोळ्यांच्या समस्येने त्रस्त आहात? मग नक्की करुन पाहा 'हे' घरगुती उपाय

सकाळवृत्तसेवा

अनेकांच्या नावडतीचा ऋतू म्हणजे उन्हाळा. फेब्रुवारी महिना संपत आला की उन्हाळ्याची चाहूल लागायला लागते. एकदा का उन्हाळ्याची सुरुवात झाली की त्याच्यासोबतच अनेक शारीरिक तक्रारीदेखील डोकं वर काढू लागतात. यात प्रामुख्याने सतत घाम येणे, घशाला कोरड पडणे, शरीराची दाह होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घामोळं. वातावरणातील तापमान वाढू लागल्यावर अनेकांना उष्णतेचे विकार होऊ लागतात. यात अनेक जण घामोळ्याच्या त्रासाने त्रस्त असतात. यात अनेकदा हात, पाठ आणि मानेवर घामोळं येतं. घामोळं आल्यावर प्रभावित जागा लालसर पडत असून सतत त्यावर खाज येत राहते. त्यामुळे घामोळं आल्यानंतर अनेकांची चिडचिडदेखील वाढते. अनेक वैद्यकीय उपचार केल्यानंतरही यावर कोणता ठोस उपाय मिळत नाही. त्यामुळेच असे काही घरगुती उपाय आहेत जे केल्यामुळे या घामोळ्याच्या त्रासातून नक्कीच सुटका होईल. त्यामुळेच घामोळे घालवण्याचे घरगुती उपाय कोणते ते जाणून घेऊयात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साधारणपणे अति उष्ण किंवा दमट वातावरणात राहणाऱ्या लोकांना घामोळ्यांचा त्रास अधिक होतो. सतत दमट वातावरणात राहिल्यामुळे घर्मग्रंथी बंद होतात आणि परिणामी, घामोळं येतं.

घामोळे घालवण्याचे काही घरगुती उपाय
१. कोरफड  -

घामोळ्यांवर कोरफड हे एक उत्तम औषध असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे घामोळे आल्यानंतर त्या जागी कोरफडीचा रस किंवा गर लावावा. कोरफडमुळे त्वचेला गारवा मिळतो.  दिवसातून दोन वेळा घामोळ्यांवर कोरफडीचा गर लावावा.

२. ओटमील -
ओटमीलदेखील घामोळ्यांवर तितकीच गुणकारी आहे. ओटमीलची बारीक पावडर करुन ती अंघोळीच्या पाण्यात टाकावी. या पाण्यात जवळपास ३० मिनीटे शांतपणे बसावं. हा प्रयोग दिवसातून दोन वेळा करावा.

३. कडुनिंब -
कडुनिंबाची पाने कोमट पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. या पाण्यामुळे सतत येणारी खाज कमी होते. तसंच घामोळे वाढतदेखील नाहीत. याच पद्धतीने कडुनिंबाच्या पानांची पेस्ट करुन त्याचा लेप घामोळ्यांवर काही वेळ लावून ठेवावा. त्यानंतर हा लेप गार पाण्याने धुवून घ्यावा.

४. मुलतानी माती -
मुलतानी मातीत काही थेंब गुलाबपाणी मिक्स करुन त्याचा लेप तयार करावा. हा लेप घामोळ्या झालेल्या जागेवर लावावा. त्यानंतर थंड पाण्याने तो धूवुन घ्यावा.

५. चंदन पावडर-
चंदन पावडर आणि गुलाब पाणी समप्रमाणात एकत्र करुन घामोळे आलेल्या ठिकाणी लावावे. हा लेप लावल्यानंतर तो गार पाण्याने धुवून टाकावा.

या गोष्टींकडेही नक्की लक्ष द्या
१. सतत घामोळं येत असेल तर अशा वेळी थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा.
२. दिवसातून दोन वेळा गार पाण्याने अंघोळ करा.
३. उन्हाळ्यात शक्यतो सुती आणि सैलसर कपडे परिधान करावेत. तसंच सुळसुळीत कपडे परिधान करण्याचं टाळा.
४. भरपूर पाणी प्या.
५. रसदार फळांचा, उसळी, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.
६. घामोळे आल्यानंतर त्यावर कोणतेही तेल किंवा क्रीम लावू नका.
७. सौम्य साबण लावा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT