health-fitness-wellness

जाणून घेऊया जीवघेणा लेप्टोस्पायरोसिस आजार

सकाळ वृत्तसेवा

लेप्टोस्पायरोसिस हा आजार जिवाणूंमुळे होत असून, तो इतर दिवसांच्या मानाने पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतो. म्हणजे या दिवसांत या आजाराचं संक्रमण अधिक होतं. हा असा आजार आहे, जो आणखी काही आजारांची पैदास करतो. हा जिवाणू मानवी शरीरात थेट शिरत नाहीत, तर म्हैस, घोडा, बकरी, कुत्रा आदी प्राण्यांच्या साहाय्याने मानवी शरीरात प्रवेश करतो. म्हणजेच या प्राण्यांद्वारे हवेत पसरून मानवामध्ये पसरतो. 

आर्द्रतेमुळे हा जिवाणू खूप काळ जिवंत राहतो आणि तो मानवी शरीराच्या संपर्कात आला, की त्या व्यक्तीला लॅप्टोस्पायरोसिस नावाचा हा आजार होतो. प्रथमदर्शनी या आजाराची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. खरं म्हणजे हा आजार जंगली प्राण्यांमध्ये अधिक आढळतो. हे प्राणी पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर त्या पाळीव प्राण्यांना होतो आणि त्यांच्यामार्फत मग या प्राळीव प्राण्यांचे मालकांपर्यंत हा आजार पसरतो. 

दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळेही हा आजार उद्‌भवतो. दूषित पाण्यामुळे व्यक्तीचे डोळे, त्वचावर परिणाम होऊन आजार वेगाने पसरला जातो. प्रामुख्याने या आजारात किडणीला बाधा होते. म्हणूनच या आजाराची बाधा प्रामुख्याने पूरग्रस्त भागात किंवा शेतीवाडी करणारी मंडळी, तसेच अन्य रुग्णांना पटकन होते. 

काही डॉक्‍टरांच्या मते, हा आजार जीवघेणा आहे. ज्या व्यक्तीला या आजाराची लागण होते, त्या व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्‍यता कमी असते. याची लक्षणं अगदी लवकर समजली, तरच त्यावर उपचार करणं अधिक सोपं असतं. याला अनेक नावं आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर - डे फिव्हर, हार्वेस्ट फिव्हर, फिल्ड फिव्हर, माईल्ड फिव्हर, रॅट कॅचर्स यलोज अशी अनेक नावं आहेत. त्याचबरोबर ब्लॅक जॉंडीज म्हणूनही ओळखला जातो.  

लेप्टोस्पायरोसिसची लक्षण पुढीलप्रमाणे 

  • डोळे लाल होणे. 
  • डोकं, कंबर आणि पाय दुखणे हे प्रमुख लक्षण आहे. 
  • स्नायू दुखणे.
  • त्वचेवर रॅश येणे.
  • वेळेवर निदान न झाल्यास पुढील लक्षणं दिसतात.
  • मेनेन्जायटिस.
  • कावीळ होणे.
  • किडणीला सूज येऊन किडणी निकामी होणे. लघवी वाटे रक्त पडणे. 

ही लक्षण काही ठराविक काळामध्येच जाणवतात. उदाहरणार्थ पहिल्या सात ते 12 दिवसांत याची लक्षणं दिसतात. साधारणतः तीन ते सात दिवसांपर्यंत आजारपण जाणवतो. यावर काही अँटिबायोटिक्‍स घेतली तरही लक्षणं नष्ट होतात. ही लक्षणं पुन्हा डोकं वर काढतात. बहुतांश लोकांना अल्प काळातला आजार होतो. मात्र दुसरी पायरी ही मॅनेन्जायटिससारख्या आजाराने होते. 

उपचार 

  • वर सांगितलेली लक्षणं कोणत्याही व्यक्तीत आढळली, तर त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क करणं आवश्‍यक आहे. 
  • आपल्या परिसरात गोशाळा किंवा अन्य कोणती जागा असेल, तर त्या ठिकाणांची स्वच्छता करणं आवश्‍यक आहे. 
  • पावसात साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलांना थांबवायला हवं. किंबहुना पावसाच्या पाण्यात खेळायला पालकांनी सोडू नये. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते त्यांच्या मलमूत्रविसर्जनावाटे हे जिवाणू बाहेर टाकले जातात. मात्र ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना अशा आजाराची लागण पटकन होते. 

     
  • अशी घ्या काळजी 
  • पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाणं टाळावं.
  • तुम्हाला अशा ठिकाणी जावंच लागणार असेल तर प्रथम डॉक्‍टरांशी सल्लामसलत करून त्यासंबंधीची औषधं बरोबर ठेवावीत, म्हणजे तुमचा या आजारापासून बचाव होईल.
  • उंदीर-घुशींचा नायनाट करावा.
  • कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावावी.
  • पूर्ण विश्रांती आणि हलका आहार घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT