health-fitness-wellness

घसा खवखवतोय? मग वेळीच करा 'हे' ७ उपचार

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा थंड पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा गार पाणी प्यायल्यामुळे आपला घसा (throat)दुखतो. यात काहींच्या टॉन्सिल्सला सूजदेखील येते. ज्यामुळे मग पुढील काही दिवस कोणताही पदार्थ नीट खाता येत नाही किंवा पाणीदेखील पिता येत नाही. सतत घसा दुखतो, जळजळ होते. यामध्येच सर्दी होण्यापूर्वीदेखील अनेक जणांचा घसा खवखवतो (throat infection). म्हणूनच, घसा खवखवणे, दुखणे या समस्यांवर काही घरगुती उपाय पाहुयात. (how to treat throat infection)

१. कोमट पाणी -

घसा खवखवत असेल तर कोमट पाण्याने गुळण्या करा. तसंच सकाळी उठल्यावर किंचित गरम पाणी प्या. ज्यामुळे घशाला शेक मिळेल. जर पाणी पिणं शक्य नसेल तर, सूप किंवा आल्याचा चहा प्या.

२. वाफ घ्या -

घशात कोणत्याही प्रकाराचा संसर्ग झाल्यास वाफ घेणं फायदेशीर ठरतं. वाफ घेतल्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो. त्यामुळे घसा दुखणे, खवखवणे, टॉन्सिल्सला सूज या समस्यांमध्ये गरम पाण्याची वाफ घ्या.

३. गरम पाण्याच्या गुळण्या -

गुळण्या करणं हा सर्वोत्तम मार्ग समजला जातो. कोमट पाण्यात अर्धात चमचा मीठ टाकून या पाण्याने गुळण्या करा. यामुळे कफ पातळ होतो.

४. चहामध्ये लवंग, तुळशीची पानं, हळद मिक्स करुन तो प्या.

५. तेलकट, मसालेदार पदार्थांपासून दूर रहा. त्यामुळे घशात जास्त जळजळ होऊ शकते.

६. पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.

७. लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले गरम पाणी प्या.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT