Laughing
Laughing Sakal
health-fitness-wellness

हसण्यासाठी जगा : स्वत:शी मैत्री, सकारात्मकतेची खात्री!

मकरंद टिल्लू

मानसिक ताणतणावावर ‘रामबाण’ उपाय म्हणजे सकारात्मक जगणं, हे प्रत्येकाच्या मनात अधोरेखित झालं  आहे. याचाच अर्थ असाही होतो, की धकाधकीच्या जीवनात लोक मानसिक दृष्ट्या नकारात्मक होत आहेत. त्यावर त्यांना मात करायची आहे. सकारात्मक जगणं आणि नकारात्मक जगणं यात एक धूसर रेषा आहे. ती पुसण्याबाबत ‘काय करायला हवं?’ याचा आपण विचार करू या.

  • पोटावरती हात फिरवताना लोकांच्या मनात येतं  ‘फिटनेस वाढवायला हवा.  व्यायाम करायला हवा.’ १ जानेवारी हा ‘सार्वजनिक व्यायाम सुरुवात दिन’ असतो. कुठला ना कुठला मुहूर्त धरून लोक  व्यायाम करायला लागतात. त्यातले बहुसंख्य जण महिन्याभरात व्यायाम सोडतात. ‘सध्या लोड आहे, मला लवकर कोणी उठवत नाही, आजच्या ऐवजी उद्या करेन, रविवारी सलग तीन तास व्यायाम करेन’ अशी विविध कारणं ‘व्यायाम का करत नाही?’ या प्रश्नावर उत्तर म्हणून त्यांच्या मनात तयार असतात.

  • ‘चांगल्या तब्येतीसाठी, चांगलं खाणं गरजेच आहे,’ हे लोकांच्या लक्षात आलं आहे. तेवढ्यात कोणीतरी सांगतो ‘लवकरच लॉकडाउन संपणार आहे,’  मग उत्साहानं ठरवलं जातं ‘याचं सेलिब्रेशन पिझ्झा मागवून करूया’!

  • बंगल्यांच्या सोसायटीमध्ये  एक कॉमन प्लॉट असतो.  त्यावर खूप घाण असते. अनंत काळापासून तिथं झाडांवर प्लास्टिकच्या पिशव्या, कापडं लटकत असतात.  ‘हा प्लॉट स्वच्छ असायला हवा,  बाजूनं झाडं लावायला हवी,’ अशा अनेक  सकारात्मक कल्पना तिथं राहणाऱ्या अनेकांच्या मनात येत असतात. पण गप्पांच्या दरम्यान कोणीतरी सांगतो, ‘मागच्यावेळी एकजण असंच करायला गेला आणि त्याला खूप मनस्ताप झाला.’ ही रंगवून सांगितलेली गोष्ट ऐकून लोकं म्हणतात, ‘जाऊ द्या. आपल्याला काय करायचंय.’ ...आणि मनातल्या इच्छेवर पडदा टाकतात.

  • लोक रस्त्यावरती  घाण टाकतात, थुंकतात ते तुम्हाला आवडत नाही.  सिग्नल पाळायला हवा. बसच्या रांगेत सर्वांनी उभं रहायला हवं. हा सकारात्मक बदल घडविण्यासाठी स्वत: काम करायचं असं अनेकांच्या मनात येतं. पण  हे काम करताना, ‘लोक काय म्हणतील,’ असा विचार येतो आणि मनातला विचार थांबतो.

स्वतःचं आरोग्य, कुटुंबीय, परिसर याबाबत अनेक चांगले विचार लोकांच्या मनात येतात. मात्र,  या गोष्टी कृतीत आणण्यापासून लोकं थांबतात. ‘आपल्याला काय करायचंय किंवा लोकं काय म्हणतील,’ असा नकारात्मक विचार करतात. त्यामुळं सकारात्मक बदल करणं स्वतःच थांबवतात. सकारात्मक विचार आला आणि त्याला कृतीची जोड असेल तरच बदल घडतो. जगामध्ये आपल्याला अनेक मित्र असतात, जे तुमच्या चांगल्या कामाच्या आड येतात. ते तुम्हाला वैचारिक शत्रू वाटतात, पण इतरांपेक्षाही अधिक वेळेला आपणच आपले शत्रू  बनतो. सकारात्मक विचार आपलं मन तयार करतं आणि  त्याची कृती थांबवण्याचं काम आपणच करतो. 

सकारात्मकता आणि नकारात्मकता यातील धूसर रेषा पुसण्यासाठी तुम्ही बिनधास्त पुढाकार घ्या.  सकारात्मकतेची स्वतःच्या अंतर्मनानं घातलेली साद,  त्याला स्वतःच मित्र होऊन प्रतिसाद देऊया!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT