health-fitness-wellness

मलायका अरोरासारखं उत्कटासन करायचंय? जाणून घ्या फायदे

सकाळ डिजिटल टीम

योगासनांचे आपल्या शरीराला होणारे फायदे खूप आहेत. चाळीशीनंतर फिट राहायचं असेल तर अनेकजण योग करण्याला पसंती देतात. त्यात मलायका अरोरा मागे नाही. मलायका रात्री उशीरापर्यंत जरी पार्टी करत असली तरी सकाळी उठून ती योगासने करण्याला महत्व देते. म्हणून तर 48 व्या वर्षीही ती अतिशय फिट आहे. ती अनेकदा सोमवारी तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत असते. 'मलायकाज मुव्ह ऑफ द विक' मध्ये तिने उत्कटासन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

असे करा आसन

एका आसनावर तुमच्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेऊन सरळ उभे राहा. त्यानंतर तुमचे दोन्ही हात समोर लांबवून खांद्याला समांतर राहतील असे ठेवा. तळहात जमिनीकडे असतील याची काळजी घ्या. त्यानंतर खुर्चीमध्ये बसताना जसे वाकतो तसे वाका. या स्थितीत तुम्हाला 10 ते 15 सेकंद राहायचे आहे. हि कृती करत असताना श्वासोश्वास निमित्त चालू राहू द्या. असे करताना तुमचे नितंब मागच्या बाजूला जाईल तसेच गुडघे हे पायांच्या तळव्याच्या पुढे जाणार नाहीत तसेच तुमच्या मांड्या पोटऱ्यांना स्पर्श करणार नाहीत याचीही काळजी घ्या. हे आसन दोन ते 3 वेळा करावे. मात्र ज्यांना गुडघ्यांचा, कमरेचा किंवा घोट्यांचा काही त्रास असेल त्यांनी हे आसन करू नये.

असे आहेत फायदे

- या आसनाचा नियमित सराव केल्यास आपल्या मांड्यांचे व पोटऱ्यांचे स्नायू मजबूत बनतात.

-पाठीच्या, कमरेच्या भागावर ताण पडून तेथील स्नायूही मजबूत बनतात.

- हे आसन नियमित केल्यास पोट सुटत नाही.

- हे आसन करताना शारीरिक तोल सांभाळावा लागतो म्हणून याला तोलासन म्हणतात. हे आसन केल्याने मन शांत होते, स्थिरावते.

- आसनाच्या नियमित सरावामुळे शरीर हलके होते व आपला उत्साह वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Spy Camera Allegation : पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; सुप्रिया सुळेंच्या आरोपाने खळबळ

दिवाळीला सुट्टी मागताना काळजी घ्या! WhatsApp वर बॉसचा OK मेसेज म्हणजे रजा मंजूर नव्हे; कर्मचाऱ्याची याचिका फेटाळली, प्रकरण काय?

Jarange Audio Clip: ''500 कोटींचं सोडा.. जरांगे पाटलांच्या विरोधात नेमकं चाललंय काय?'', राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, जवळची माणसं फोडून...

Marathi News Live Updates:साताऱ्यात मतदानादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे समोरासमोर, हस्तांदोलनासह मिश्किल टोलेबाजीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Vastu Tips: दिवाळीपूर्वी घरात रंगकाम करताय? चुकीचा रंग आणू शकतो गरिबी! घर रंगवताना नक्की पाळा वास्तूचे 'हे' नियम...

SCROLL FOR NEXT