health drink sakal media
health-fitness-wellness

मुलांच्या विशिष्ठ पोषण गरजांसाठी बाजारातील हेल्थड्रिंक निरुपयोगी

कृष्ण जोशी

मुंबई : बाजारात मिळणारी हेल्थ फूड ड्रिंक (Health Food Drink) आपल्या मुलांच्या विशिष्ठ पोषण गरजांसाठी (Nutrition needs) उपयुक्त नसल्याने आपल्या मुलांच्या विशिष्ठ प्रकृतीनुसार तयार केलेले वेगळे हेल्थ फूड ड्रिंक असावे, अशी बहुसंख्य आयांची मागणी असल्याचे एका सर्वेक्षणात (report) दिसून आले आहे. प्रत्येक मुलाची पोषणतत्वांची गरज आणि आरोग्याची उद्दिष्टे (Health Objectives) वेगवेगळी असतात. आपल्या मुलाच्या पोषणतत्वांच्या गरजा इतरांपेक्षा वेगळ्या असल्याचे 90 टक्के मातांना वाटते, असे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

देशभरात हेल्थ फूड ड्रिंक्सचा वापर कशाप्रकारे केला जातो याबाबत या सर्वेक्षणात सखोल माहिती देण्यात आली आहे. मुलांना पौष्टिक भोजन आणि हेल्थ ड्रिंक देणाऱ्या देशभरातील पाचशे मातांचे यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. चार वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसंदर्भात हे सर्वेक्षण झाले. मुलांना नेहमी चविष्ट खाद्यपदार्थ आवडतात. यामुळे बहुतांश मातांना चवदारपणा आणि सकसता यांच्यात अचूक सुवर्णमध्य साधण्याची कसरत करावी लागते. बहुतांश मातांच्या मते दूध हे त्यांच्या मुलांसाठी संपूर्ण अन्न असून ते आरोग्यवर्धक आणि पुरेशी पौष्टिक तत्त्वे देते.

बाजारात सध्या उपलब्ध असलेली हेल्थ फूड ड्रिंक्स आपल्या मुलाच्या विशिष्ट पौष्टिक गरजांची पूर्तता करत नाही, असे 75 टक्के मातांना वाटते. यामुळे आपल्या मुलांची विशिष्ट प्रकृती व गरजांसाठी विशेषपणे तयार केलेले हेल्थ फूड ड्रिंक असावे, अशी 85 टक्के मातांची मागणी असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. मातांना मुलाची उंची, वजन, मेंदूची सक्रियता आणि ऊर्जा यांची सर्वाधिक काळजी असते. त्या त्या गरजांनुसार वेगळे हेल्थ ड्रिंक असावे असेच आयांना वाटते. मॉम्सप्रेसो डॉटकॉम व ग्रिट्झो यांनी हे सर्वेक्षण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT