health-fitness-wellness

पोटदुखीपासून सर्दी-खोकल्यापर्यंत; ओव्याच्या पानांचे फायदे

ओव्याप्रमाणेच त्याची पानंदेखील तितकीच गुणकारी आहेत.

शर्वरी जोशी

प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात सर्रास आढळून येणारा पदार्थ म्हणजे ओवा (ova leaves ). पराठा, भाजणी, चकली, भजी अशा अनेक पदार्थांमध्ये ओवा घातला जातो. ओव्यामुळे पोटाविषयीच्या अनेक तक्रारी दूर होतात. त्यामुळे कायम डाळीच्या पीठाचे ( बेसन) कोणतेही पदार्थ करायचे असतील तर त्यात ओवा घातला जातो. ओव्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस होणे अशा समस्या दूर होतात. त्यामुळे ओवा हा कायम प्रत्येकाचा घरात असतो. विशेष म्हणजे केवळ ओवाच कशाला त्याची पानंदेखील तितकीच गुणकारी आहेत. मऊसर हिरवी दिसणारी ही पानं अनेक आजारांवर गुणकारी आहे. म्हणूनच ओव्याप्रमाणेच त्याच्या पानांचे गुणधर्म व फायदे कोणते ते पाहुयात. (ova leaves have medicinal qualities know-benefits ova home remedies)

ओव्याची पानं खाण्याचे फायदे

१. बॉडी डिटॉक्स होते -

ओव्याची पानं हे एक उत्तम नैसर्गिक डिटॉक्स आहे. या पानांचा काढा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे थोडी ओव्याची व तुळशीची पानं एकत्र करुन त्याचा काढा तयार करावा. त्यानंतर त्यात २-३ थेंब लिंबाचा रस मिक्स करावा व हा काढा घ्यावा. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासोबतच शरीराचं हायड्रेशनदेखील होते.

२. पोटदुखी दूर होते -

साधारणपणे कधीही आपलं पोट दुखू लागलं की आपण ओवा खातो. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरी ओव्याचं झाड असेल तर ओव्याऐवजी त्याची पानं खा. या पानांमुळे पोटदुखी दूर होण्यासोबतच गॅस्ट्रोइंटेस्टइनची समस्यादेखील बरी होते.

३. पचनक्रिया सुधारते -

आपलं अन्नपचन जर नीट झालं नाही तर अनेक शारीरिक समस्या डोकं वर काढतात. यात पोटदुखी, अॅसिडिटी, जळजळ, पित्त होणे अशा समस्या हमखास होतात. त्यामुळे दिवसातून एकदा तरी ओव्याचं कोवळं पान खावं.त्यामुळे पचनक्रिया सुधारते व भूकदेखी वाढते.

४. तोंडाची दूर्गंधी दूर होते -

दिवसभर आपण अनेक वेगवेगळे पदार्थ खात असतो. त्यामुळे सहाजिकच हे अन्न कण दातांमध्ये अडकून तोंडाला दुर्गंधी येते. म्हणूनच ही दुर्गंधी दूर करायची असेल तर दररोज जेवण झाल्यावर ओव्याचं पान खावं.

५. सर्दी-खोकला बरा होतो -

सर्दी किंवा खोकला झाल्यास ओव्याची ७-८ पानं घेऊन ते एक ग्लास पाण्यात उकळवावीत. त्यानंतर हे पाणी अर्धा ग्लास होईल इतकं आटवावं. त्यानंतर हे पाणी गार झाल्यावर गाळून त्यात मध टाकून प्यावं.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला...

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT