pneumococcal vaccine pneumococcal vaccine
health-fitness-wellness

डोसचा अवधी चुकलेल्या बालकांना न्यूमोकोकल लस देणार कशी?

देशातील एकूण बालमृत्यूच्या विविध कारणांपैकी १५ टक्के बालमृत्यू हे केवळ न्यूमोनियामुळे होतात

मनोज साखरे

औरंगाबाद: pneumococcal vaccine: केंद्र शासनाने ‘न्युमोकोकल’ या लसीचा नियमित लसीकरणात समावेश केला. त्यानुसार कार्यवाहीही सुरु झाली. लसीचा पहिला डोस दीड, दुसरा डोस साडेतीन व बुस्टर डोस नऊ महिन्यांनंतर बालकांना दिला जाणार आहे. पहिला व दुसरा डोसचा लाभ न मिळालेल्या व दीड, साडेतीन व नऊ महिने उलटून गेलेल्या बालकांच्या डोसचा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. अशा बालकांना डोस न मिळाल्यास संभाव्य तिसऱ्या लाटेत या बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

देशातील एकूण बालमृत्यूच्या विविध कारणांपैकी १५ टक्के बालमृत्यू हे केवळ न्यूमोनियामुळे होतात. न्यूमोनिया होण्याची वेगवेगळी कारणे त्यापैकी दोन वर्षाखालील बालकांमध्ये होणारा न्यूमोनिया हा स्ट्रेप्टोकोकस निमोनी या जिवाणूंमुळे होतो. वेळेवर उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी एक वर्षाच्या आतील बालकांना न्यूमोनियाची लस दिली जाणार आहे. ‘न्युमोकोकोल’ लसीकरण धोरणांबाबत सरकारकडून उचलण्यात आलेले पाऊल स्वागतार्ह आहे. तरीही कोरोनाच्या धर्तीवर बालकांमध्ये जीवघेणा आजार असलेला न्युमोनिया होऊ नये यासाठी केलेल्या कृतीला विलंबच झाला आहे.

अशातच न्युमोकोकल लसीकरणाचे धोरणही सरकारने ठरविले आहे. त्यानुसार कृती कार्यक्रम सुरु झालेल्या दिवशी दीड महिन्यांच्या आतील बालकांना लसीचा पहिला डोस देणे सुरु झाले. परंतू अंमलबजावणीच्या दिवशी असंख्य बालकांचे वय दोन ते तीन महिण्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांचा पहिला डोस मात्र चुकला. दुसरा डोस साडे तीन महिण्यांवेळी द्यावा लागणार आहे, त्यावेळी याच बालकांचे वय साडे पाच ते साडे सहा महिणे होतील तेव्हा या बालकांच्या ‘न्युमोकोकल’च्या पहिल्या व दुसऱ्या डोसबाबत नियोजन झालेले नाही. त्याबाबत कोणतीही सुचना आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या दिसत नाही. याबाबत आरोग्य उपसंचालक स्वप्निल लाळे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

लस सामान्यांच्या आवाक्याबाहेर-
बालकांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. डोस चुकलेल्या बालकांचे कसे? याबाबत महापालिकेच्या आरोग्य केंद्राकडे विचारणा केली तेव्हा पहिला डोस खासगी रुग्णालयात घ्या; मग दुसरा डोस देऊ अशी भुमिका घेतली. ही लस खासगी रुग्णालयात घेणे सामान्यांना परवडणारे नाही, त्यामुळे सरकारी पातळीवर तोडगा निघायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT