prashant-damle 
health-fitness-wellness

साखर असूनही कसे राहतात प्रशांत दामले फिट अँड फाइन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नियमित औषधे, मनाला ताजेतवाने ठेवणे, रोजच्या रोज मनातील किल्मिषं दूर करणे आणि व्यायामाला दांडी न मारण्यानं साखर असूनही फिट अँड फाइन राहतो, असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. निमित्त होते डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेने मधुमेह दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. यानिमित्ताने प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी प्रशांत दामले यांची ‘मधुमेहासमवेत हसत खेळत एक सकाळ’ या कार्यक्रमाअंतर्गत मुलाखत घेतली.

कार्यक्रमाला असोसिएशनचे कार्यवाह डॉ. रमेश गोडबोले, सहकार्यवाह डॉ. भास्कर हर्षे, असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. जगमोहन तळवलकर, कार्यकारिणी सदस्य सतीश राजपाठक, परिक्षित देवल हे उपस्थित होते. डॉ. गोडबोले यांच्या हस्ते सुधीर गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला, तर डॉ. तळवलकर यांच्या हस्ते अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला.  

मलाही मधुमेह आहे. जीवनशैली धकाधकीची आहे, तरीही नियमित व्यायाम, नियंत्रित पण मनाजोगता आहार, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि महत्त्वाचे म्हणजे दररोज रात्री मनाविरुद्धच्या घटना हद्दपार करतो अन्‌ आनंदी राहतो, अशा शब्दांत त्यांनी फिटनेसचे रहस्य सांगितले.

सुधीर गाडगीळांशी गप्पा मारताना आपला जीवनपट उलगडून सांगितला. नोकरी, नाटक आणि चित्रपटातील भूमिका करताना यशोशिखरे गाठली. प्रत्येकाकडून शिकत गेलो. राजा परांजपे, शरद तळवलकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी यांच्याकडून खूप शिकलो. नाटकानं पेशन्स ठेवायला शिकविले. दुसऱ्याच्या चुकांवर बोट न ठेवता सांभाळून घेऊन पुढे जायला शिकलो. हेच यशाचे गमक आहे, असे दामले म्हणाले.

सुरवातीला प्रास्ताविकात डॉ. भास्कर हर्षे यांनी, मधुमेहाची व्याप्ती सर्व वयोगटात वाढत आहे. विविध पाहणीत ते स्पष्ट होत आहे. हे लक्षात घेऊन गोयल बंधूंच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प राबवणार आहोत. त्याला मदत करावी, असे आवाहनही केले. अर्चना रायरीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. अमित वाळींबे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cab Rules: कॅब ॲग्रीगेटर धोरणात मोठा बदल! कॅब राईड रद्द करणे चालकांना महागात पडणार; सरकार आता 'इतका' दंड वसूल करणार

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा धडाका पाहायला व्हा सज्ज... टीम इंडियाने टॉस जिंकला, Playing XI मध्ये एकाचे पदार्पण, कोण आहे Ashok Sharma?

Mumbai Police: 'खिशात पावडर टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन', मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; गृह विभागाचा दणका

Latest Marathi Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला

'तिला कॅन्सर झालाय आता ती लवकरच...' सविता मालपेकरांचं टक्कल पाहून पसरलेली अफवा, मांजरेकराकडे रडत जात म्हणालेल्या...

SCROLL FOR NEXT