pregnant women pregnant women
health-fitness-wellness

अत्यवस्थ रुग्णांपैकी दर पाचवी रुग्ण कोरोना लस न घेतलेली गर्भवती महिला

गर्भवती महिलांसाठी धक्कादायक माहिती

सकाळ डिजिटल टीम

कोविडमुळे अत्यवस्थ असलेल्या एकूण रुग्णांपैकी एक पंचमांश रुग्ण या लसीकरण न झालेल्या गर्भवती स्त्रिया आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांनी अशा मातांना कोविड लस घेण्यासाठी आग्रह केला.लस न घेतल्याने त्यांना स्वतःला आणि त्यांच्या मुलांना आजार आणि मृत्यूचाही धोका आहे, असेही सांगितले.
लस गर्भवती मातांना धोकादायक असल्याची'अँटी-व्हॅक्सर्स' द्वारे दिली जाणारी चुकीची माहिती हीच गैरसमजुतींना उत्तेजन देण्यासाठी जबाबदार असल्याचं अधिकाऱ्यांना वाटतं.
रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट्सचे अध्यक्ष डॉ. एडवर्ड मॉरिस म्हणतात की, 'आम्ही गर्भधारणेदरम्यान लस घेण्याबाबत महिलांच्या चिंता समजून घेतल्या आहेत . त्यामुळे लसीकरणाता आणि गर्भपाताचा वाढता धोका तसेच अकाली बाळंतपण याचा काहीही संबंध नाही.’, असे आम्हाला सांगावेसे वाटते. एनएचएस इंग्लंडने म्हटले आहे की, इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये गर्भधारणेदरम्यान १००००० हून अधिक आणि अमेरिकेतील आणखी १६०००० कोविड लसीकरणाची आकडेवारी दर्शविते की, लसीकरणांतर गर्भ किंवा अर्भकाला कोणतीही हानी झाली नाही.

कोविडमुळे रुग्णाच्या फुफ्फुसाचे इतके नुकसान होते की, व्हेंटिलेटर काम करत नाहीत. यात १६ ते ४९ वयोगटातील महिलांपैकी ३२ टक्के गर्भवती महिलांचा समावेश असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. एनएचएस इंग्लंडने म्हटले आहे की, मार्च २०२० मध्ये साथीच्या प्रारंभी हा आकडा सहा टक्क्यांनी वाढला होता. कोरोनाची लस तुम्हाला, तुमच्या बाळाला आणि तुमच्या प्रियजनांना सुरक्षित आणि हॉस्पिटलपासून दूर ठेवू शकते'.असे या डेटावरून स्पष्ट लक्षात येत असल्याचे इंग्लंडच्या मुख्य मिडवाइफ, जॅकलिन डंकले-बेंट यांनी सांगितले. तुम्ही गरोदरपणात कधीही लस घेऊ शकता, परंतु लसीकरण न झालेल्या गर्भवती स्त्रियांना कोरोना झाल्यास ते अत्यावस्थ होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्ही शक्य तितक्या लवकर लस घ्यावी हा सल्ला बेंट यांनी दिला आहे.

corona vaccination

नॅशनल चाइल्ड बर्थ ट्रस्टने (एनसीटी) म्हटले आहे की, निर्बंध कमी झाल्यानंतर या गर्भवती महिलांकडे लक्ष न दिल्याचा गंभीर परिणाम ही आकडेवारी दर्शविते.
तर, एनसीटीमधील प्रभाव आणि प्रतिबद्धता संचलिका- सारा मॅकमुलेन म्हणाल्या की, ‘लसीकरण कार्यक्रमाबद्दल इतकी चुकीची माहिती आणि गोंधळ पाहून आम्ही अत्यंत निराश झालो आहोत.’आम्ही गर्भवती महिलांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करत आहोत आणि त्यांना निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी आमच्या वेबसाइटवर माहिती उपलब्ध आहे.
एनएचएस इंग्लंडने म्हटले आहे की, इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये गर्भधारणेदरम्यान १,००,००० हून अधिक आणि अमेरिकेत आणखी १,६०,००० कोविड जॅब्सची आकडेवारी दर्शवते की, त्यानंतरच्या गर्भाला किंवा अर्भकाला कोणतीही हानी झाली नाही.
डॉ. एडवर्ड मॉरिस (रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट्सचे अध्यक्ष) म्हणाले की, अतिदक्षता विभागातील लसीकरण न झालेल्या गर्भवती महिलांची संख्या दर्शवते की 'गर्भधारणेमध्ये कोविड -१९ पासून गंभीर आजाराचा धोका होऊ शकतो.'
ते असंही म्हणाले की, 'आम्ही सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन करत आहोत. कोविड १९ पासून गंभीर आजाराच्या संभाव्यतेपासून आई आणि बाळ दोघांचे संरक्षण करण्याचा लस हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे दर्शवणारे भक्कम पुरावे आहेत.
आम्ही महिलांना आश्वस्त करू इच्छितो की, लस आणि गर्भपात होण्याचा धोका, अकाली जन्म किंवा बाळंतपण यांचा कोणताही संबंध नाही.
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या आकडेवारीनुसार ८१००० हून अधिक गर्भवती महिलांना कोविड लसीचा पहिला डोस आणि सुमारे ६५००० गर्भवती महिलांना दुसरा डोस मिळाला आहे.

Kids

मुलांचे लसीकरण गरजेचे
शाळकरी मुलांचे लसीकरण कमी वेगाने झाल्याने कोरोना पुन्हा निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. स्कॉटलंडमधील २५ टक्के लोकांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये १२ ते १५ वर्षांच्या मुलांपैकी फक्त ११ टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे.

परंतु राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात एका बाधित विद्यार्थ्यामुळे १५ जणांना लागण झाली आहे. तज्ञांनी सांगितले की, वॉक-इन केंद्रांऐवजी शाळांमध्ये लस देणे हे विलंबाचे कारण असू शकते. मुख्याध्यापकांनी 'लसीकरण दिवस' रद्द होण्यासाठी अपुरे कर्मचारी आणि लसींचा तुटवडा या गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगितले.
सरकारने म्हटले होते की, 'बहुसंख्य' लोकांना २५ ऑक्टोबरपर्यंत फायझर लस प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे, जे लक्ष्य आता पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही.
असोसिएशन ऑफ स्कूल अँड कॉलेज लीडर्सचे ज्योफ बॅरन म्हणतात की, 'हे रोलआउट शक्य तितक्या लवकर होईल याची खात्री करण्यावर सरकारने अधिक लक्ष का ठेवले नाही हे आम्ही समजू शकलो नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update: पवईत आढळले दोन अजगर, रेस्क्यू टीम घटनास्थळी

SCROLL FOR NEXT