Kidney stone esakal
health-fitness-wellness

नारळाऐवढा मुतखडा काढण्याचा विक्रम; डॉक्टर 2 रेकॉर्ड‌ने सन्मानित

त्यांनी शस्त्रक्रियेतून ५० वर्षीय शेतकऱ्याच्या मूत्राशयातून सुमारे किलोभर वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढल्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील तेजनक्ष हॉस्पिटलचे संचालक डॉ. आशिष पाटील यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यांनी शस्त्रक्रियेतून ५० वर्षीय शेतकऱ्याच्या मूत्राशयातून सुमारे किलोभर वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढल्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. या रेकॉर्डनंतर विविध विक्रम आपल्या नावे करणारे डॉ. पाटील आता देशातील एकमेव डॉक्टर ठरले आहेत. (Latest Marathi News)

डॉ. पाटील यांनी स्वतःचा पूर्वीचा विक्रम मोडीत काढत नव्याने दोन विक्रमांची भर घातली आहे. डॉ. पाटील हे आता तीन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, दोन गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड, दोन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, रिप्लेज् बिलीव्ह ऑन नॉट यासह २१ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. तसेच मूत्ररोग चिकित्सेतील विविध संशोधनाचे पाच पेटंट मिळविणारे डॉ. पाटील हे देशातील एकमेव डॉक्टर ठरले आहेत. पाटोळी (जि. नंदुरबार) येथील शेतकरी रमण चौरे यांच्या मूत्राशयात नारळ एवढ्या आकाराचा व सुमारे एक किलो वजनाचा मूतखडा डॉ. पाटील यांनी काढला आहे. त्याची दखल इंडिया बुक आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली.

निष्ठेने कामाची पावती
सतत सर्वश्रेष्ठ काम करण्याची जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि रुग्णांचा विश्वास या जोरावर आजवरची वाटचाल राहिली आहे. त्यामुळेच राज्यातूनच नव्हे तर देशभरातून विविध गुंतागुंतीचे रुग्ण माझ्याकडे येतात. त्यांना सर्वश्रेष्ठ सुविधेसह रोगमुक्त करण्याकडे नेहमीच लक्ष असते. पुरस्कार ही कामाची पावती असून, त्याद्वारे अधिक काम करण्यासाठी ऊर्जा मिळते, असे मूत्ररोग विशेषज्ज्ञ डॉ. आशिष पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT