Reduce increased Obesity in Children during corona lockdown period
Reduce increased Obesity in Children during corona lockdown period 
health-fitness-wellness

कोरोना काळात लहान मुले झाली लठ्ठ; वाढलेले वजन 'असे' करा कमी

मीनाक्षी गुरव

पुणे : एरवी मैदानात तासन्‌तास खेळणारा, दिवसभरात साधारणत: एक ते तीन किलोमीटर सायकल चालविणारा राघव गेल्या आठ महिन्यांपासून घरातच आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने घराबाहेर फारसे पडता येत नसल्याने काहीसा नाराज आहे. त्याशिवाय त्याचा 'मुड रिफ्रेश' व्हावा म्हणून त्याचे जंकफुड खाण्याचे हट्ट पुरविले जात आहे. काही कारणामुळे डॉक्‍टरकडे जाणे झाले, त्यावेळी राघवचे वजन जवळपास सात ते आठ किलोंनी वाढल्याचे लक्षात आले,'' असे निरीक्षण त्याची आई श्‍वेता यांनी सांगितले. 

कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाऊनपासून राघव घरातच आहे. त्याचे मैदानातील खेळणे, सायकल चालविणे पुर्णपणे बंद झाले होते. काही दिवसांपूर्वी श्‍वेता या डॉक्‍टरांकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना आपल्या मुलांचे वजन वाढल्याचे दिसून आले. सध्या डॉक्‍टरांच्या सल्ल्यांने त्या राघवचे वजन नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक हालचाली पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहेत. परंतु कोरोनच्या संकट काळात राघव याच्याप्रमाणेच साधारणत: सहा ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांमधील लठ्ठपणा वाढल्याचे निरीक्षण बालरोगतज्ञ आणि आहारतज्ञ नोंदवित आहेत.

लहान मुलांमधील लठ्ठपणा नेमका वाढला कसा?
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हा जवळपास सगळ्यांचेच आवश्‍यक कामाव्यतीरिक्त घराबाहेर पडणे बंद होते. टप्प्या-टप्प्याने अनलॉक होत असले तरी लहान मुलांना घराबाहेर पडण्याचा मार्ग अद्यापही बऱ्याचअंशी बंद आहे. गेल्या आठ महिन्यांपासून निदान शहरी भागातील मुले तरी घरातच आहेत. लहान मुलांना नवनव्या गोष्टींचे आकर्षण असते. शिवाय ते खेळामध्ये भरपूर रमतात. परंतु या काळात घराबाहेर खेळणे बंद झाले. थोडक्‍यात काय, तर मुलांच्या शारीरिक हालचाली लक्षणीयरित्या कमी झाल्या. त्यात घरात मुलांचा डिजीटल मिडियावरचा वावर वाढला. घरोघरी मुलांचे हट्ट पुरविले जाऊ लागले आणि त्यामार्गे जंकफुडची घरात सातत्याने "एंट्री' होऊ लागली. शारीरिक हालचाली थांबल्या आणि जंकफुड, तेलकट, गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले. नेमकं हेच मुलांचे वजन आणि त्यांच्यामधील लठ्ठपणा वाढण्यास कारण ठरले.

30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढला लठ्ठपणा
"परवाच एक चौदा वर्षाचा मुलाला घेऊन पालक हॉस्पीटलमध्ये आले होते. त्याचे वजन 87 किलो झाले होते. गेल्या काही महिन्यांत त्याचे वजन तब्बल 15 किलोंनी वाढल्याचे निदर्शनास आले. कोराना काळात म्हणजे लॉकडाऊनपासून आतापर्यंत साधारणत: सहा ते सोळा वर्षे वयोगटातील बहुतांश लहान मुलांच्या वजनामध्ये 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मुलांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यात जंकफुड, गोड आणि अति गोड खाणे याची भर पडत आहे.''
- डॉ. एम. आर. भालेराव, बालरोगतज्ञ

"कोरोनाच्या संसर्गामुळे लहान मुलांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. त्यामुळे शारीरिक हालचाली लक्षणीयरित्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे मुलांमधील लठ्ठपणा वाढला आहे. साधारणत: सरासरी 20 ते 30 टक्के मुलांमध्ये लठ्ठपणा असल्याचे दिसून येत आहे. विशेषकरून मुलांच्या पोटावरील चरबी अधिक प्रमाणात वाढल्याचे निरीक्षण आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास हे वजन नियंत्रणात आणणे शक्‍य आहे. व्यायामामध्ये अगदी चालण्याचा व्यायामही करता येऊ शकतो.''
- डॉ. प्रणिता अशोक, आहारतज्ञ

वाढलेले वजन, लठ्ठपणा असा करा कमी:
- संतुलित आहार महत्त्वाचा (प्रथिनेयुक्त आहार)
- शरीराच्या हालचाली वाढविणारे खेळ, व्यायाम करा
- 80 टक्के डायट हे हवेच
- सूर्यनमस्कार, प्राणायाम करा
- दररोज किमान पाच ते दहा हजार पावले चालणे
- मुलांचा "स्क्रिन टाईम'वर नियंत्रण ठेवा
- जंक फुड, गोड आणि अतिगोड खाणे टाळावे
- आळसपणा झटकून शारीरिक हालचाली वाढविणे आवश्‍यक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT