health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : जाणीव मर्त्य असल्याची...

सद्गुरू, ईशा फाउंडेशन

आपण मर्त्य असल्याची जाणीव भौतिकतेच्या पलीकडच्या शोधासाठी नेहमीच प्रेरक शक्ती आहे. आपला मृत्यू होईल हे कोणाला माहिती नसल्यास कुणीच अध्यात्माचा शोध घेणार नाही. तुम्ही तरुण असताना तुम्हाला वाटते तुम्ही अमर आहात. परंतु, तुम्ही मोठे होता तसे तुमचे शरीर तुम्हाला याची जाणीव करून देते, की तुम्ही नश्वर आहात. 

असं म्हणतात, शिव नेहमी स्मशानात राहत असे. बहुतेक योगी स्मशानात राहिला आहे. स्मशान नेहमीच पवित्र मानले गेले, कारण ते तुम्हाला प्रखरतेने मृत्यूची जाणीव करून देते. कोणतरी मेल्यावर ते तुमचे कोणी नसूनही ते तुम्हाला बोचते, तुमच्या अस्तित्वाचे मर्त्य स्वरूप तुम्हाला तुमच्या शरीरात जाणवते. मानसिक किंवा भावनिक प्रतिक्रिया देखील असू शकतात, पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट शरीर त्याच्या पद्धतीने जीवन सामावून घेत असते. 

शरीराची स्वतःची अशी स्मृती असते, जी ते त्याच्या मार्गाने कार्य करते. आत्ता तुमच्या शरीरातल्या स्मृती तुमच्या मनातल्या स्मृतींपेक्षा अधिक सक्तीने राज्य करत आहेत. शरीराच्या स्मृती मानसिक स्मृतींपेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वाच्या आहेत. 

योगीजन नेहमीच डोंगर-दरीत राहणे पसंत करतात, कारण तिथे शरीराला सतत मर्त्य असल्याची जाणीव होत असते - मानसिक किंवा बौद्धिक जाणीव नाही, तर शारीरिक जाणीव. तिथे जीवन आणि मृत्यू यांच्यामधील अंतर खूप धूसर असते. पर्वतांवर ते अंतर कमी होते. डोंगर-दरीत राहिल्याने तुम्हाला कायम याची जाणीव असते, की तुमचे अस्तित्व क्षणभंगुर आहे. तुम्ही जे कोणी आहात त्याची नश्वरता तुमच्या लक्षात आल्यास तुमच्या शरीराला याची जाणीव झाली की, ते येथे कायमचे असणार नाही; एक दिवस धरती ते परत घेणार आहे आणि तो दिवस आजही होऊ शकतो याची जाणीव झाली - तर मग आता न ढळता तुमचा आध्यात्मिक शोध सुरू होईल. म्हणून योग्यांनी डोंगर-दऱ्या निवडल्या. ते मर्त्य असल्याची जाणीव त्यांना सतत हवी होती, जेणेकरून त्यांचा आध्यात्मिक शोध ढळणार नाही. 

तुमच्या शरीराचे स्वरूप काय आहे, याची तुम्हाला सतत जाणीव करून दिली जाणे महत्त्वाचे आहे. तुमचे आयुष्य ज्या शरीराभोवती घिरट्या मारते, ते पृथ्वीचाच छोटासा तुकडा आहे. योगींना याची सतत शारीरिक जाणीव हवी होती. या साठीच त्यांनी नेहमीच पृथ्वीच्या निकटच्या सहवासात राहणे निवडले. पृथ्वीच्या सहवासात कसे राहायचे? तुम्ही एक खड्डा खोदून विहिरीत बसू शकता, पण ते व्यावहारिक नाही. म्हणून ते डोंगरावर गेले आणि तेथे असलेल्या नैसर्गिक गुहांची निवड केली, जिथे भौतिक शरीराला सतत आठवण करून दिली जाते की पृथ्वी तुम्हाला तिच्या आत परत शोषून घेण्याचा प्रयत्न करत आहे. धरती माता तिने तुम्हाला दिलेले कर्ज लवकरात लवकर परत घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचा जगण्यासाठीचा लढा हा याच्याच विरोधातला संघर्ष आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT