Sadguru Sakal
health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : शारीरिक स्मृती आणि ऋणानुबंध

अशी एक गोष्ट आहे ज्याला ऋणानुबंध म्हणतात, एक प्रकारची भौतिक स्मृती जी तुमच्या शरीरात आहे. ऋणानुबंधाची तुलना पालकांकडून मुलांमध्ये आलेल्या आनुवंशिक घटकांशी केली जाऊ शकत नाही.

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

शरीराला स्वतःच्या स्मृती असतात. सध्या या विषयावर संशोधन सुरू आहे. सोप्या भाषेत सांगायचं, तर समजा तुमच्या वडिलांना त्यांच्या लहानपणी गोल आकाराच्या वस्तूंशी खेळायला आवडत होतं आणि त्यांची त्याबद्दल आस्था निर्माण झाली होती. त्यांचा मुलगा म्हणून नकळत तुमचा सुद्धा तशाच प्रकारच्या वस्तू निवडण्याकडं कल असेल. हे सिद्ध झालं आहे, की अशा पुनरावृत्ती घडतात. याचं कारण म्हणजे तुमच्यात आनुवंशिक स्मृती आहेत.

अशी एक गोष्ट आहे ज्याला ऋणानुबंध म्हणतात, एक प्रकारची भौतिक स्मृती जी तुमच्या शरीरात आहे. ऋणानुबंधाची तुलना पालकांकडून मुलांमध्ये आलेल्या आनुवंशिक घटकांशी केली जाऊ शकत नाही. तुम्ही जिथून आलात, ती मुळ भौतिक स्मृती – पण ती तुमच्या त्वचेचा रंग, नाकाचा आकार, तुमची जडणघडण यांसंदर्भातच असली पाहिजे, असे नाही. एवढंच आहे, की कोणत्याही प्रकारची जवळीक शरीर आठवतं - फक्त इतर शरीराबरोबरच नव्हे, तर कोणत्याही भौतिक पदार्थाबरोबरसुद्धा. अगदी एवढं. की तुम्ही कोणाशी हात मिळवल्यावरही ऋणानुबंध निर्माण होतात. म्हणूनच भारतात लोक हात जोडून अभिवादन करतात. काही विशिष्ट वस्तू जसे की मीठ, तीळ किंवा माती देण्याच्या बाबतीतही हे लागू आहे. ऋणानुबंध निर्माण होऊ नयेत म्हणून ह्या गोष्टी लोक दुसऱ्या कुणाच्या हातून घेत नाहीत.

तुम्ही अनेक प्रकारे ऋणानुबंध निर्माण करता, पण लैंगिक संबंधांमुळे ज्या प्रमाणात स्मृती निर्माण होतात, त्यांचा सर्वाधिक प्रभाव पडतो. हा काही अपराधीपणाचा प्रश्न नाही. अपराधीभाव ही सामाजिक गोष्ट आहे. एखाद्या समाजमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल अपराधीपणा वाटतो, तोच दुसऱ्या समाजात वाटत नाही. हे काही सामाजिक जडणघडणी बद्दल नाही - आपण फक्त अस्तित्वाच्या पैलूंकडे पाहत आहोत. ऋणानुबंध नष्ट करण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. पोंगल किंवा भोगीसारखे काही सण तुमचे मानसिक आणि भावनिक भार आणि ऋणानुबंध संपवण्यासाठी असतात. लिंग भैरवीसारख्या काही मंदिरांमध्ये ‘अग्नी स्नान’ विधी आहेत. तुम्ही साठवलेल्या शारीरिक स्मृती जाळून टाकण्याचा हा एक मार्ग आहे. आणि अर्थातच दररोज अंघोळ. माझ्या आयुष्यात एकेकाळी जेव्हा मी खडतर साधना करायचो तेव्हा मी दररोज पाच ते सात वेळा अंघोळ करत असे. कारण तुमची शरीरयंत्रणा संवेदनशील झालेली असते. उदाहरणार्थ, तुम्ही एका ठराविक उशीवर बसता आणि ती उशी तुमच्यावर काय परिणाम करते याची तुम्हाला जाणीव होते म्हणून, कमीत कमी पाणी अंगावर वाहवून तुम्हाला ते धुवून टाकायचे असते.

दुसरा मार्ग म्हणजे विशिष्ट ऋतूंमध्ये जेव्हा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडं सरकतो (जून) आणि पुन्हा उत्तरेकडून दक्षिणेकडं सरकतो (डिसेंबर) तेव्हा भारतीय उपखंडामध्ये जोराचे वारे वाहतात. एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं उभे राहा, जेणेकरून वाऱ्यानं नाहून निघाल. जेव्हा जोराचे वारे वाहत असतात तेव्हा थोडे सैल कपडे घालून जाणीवपूर्वक डोळे बंद करून अर्धा तास फक्त उभे राहा. दोन्ही बाजूंना वळा, जेणेकरून मागून आणि पुढून वारा तुमच्यावरून वाहेल. तुम्हाला खूप हलके आणि चांगलं वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT