health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : समर्पण, परिपूर्ण जीवन

बहुसंख्य माणसे सामान्य जीवन जगतात याचे एक कारण म्हणजे ते प्रत्येक गोष्टीत कंजूष आहेत. ते पूर्णपणे हसू शकत नाहीत किंवा स्वतःला पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत.

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

बहुसंख्य माणसे सामान्य जीवन जगतात याचे एक कारण म्हणजे ते प्रत्येक गोष्टीत कंजूष आहेत. ते पूर्णपणे हसू शकत नाहीत किंवा स्वतःला पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत.

बहुसंख्य माणसे सामान्य जीवन जगतात याचे एक कारण म्हणजे ते प्रत्येक गोष्टीत कंजूष आहेत. ते पूर्णपणे हसू शकत नाहीत किंवा स्वतःला पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत. तुम्ही इतके कंजूषपणे वागलात, तर आयुष्यही तुमच्यासोबत खूप कंजूष वागते.

तुमच्यावर मर्यादा आणणाऱ्या एखाद्या गोष्टीने तुम्हाला गिळंकृत केले जाण्याचा धोका नाही, तर धोकादायक आहे तो म्हणजे हिशेब. कंजूष माणसाची गणिते अमर्याद असतात – ती कधी संपतच नाहीत. जर त्यांना एखादे फळ मिळाले तर ते त्याचे लाखो तुकडे करून एखादा तुकडा कुणाला तरी द्यावे वाटते. एका फळाचे दशलक्ष तुकडे करायला अर्धे आयुष्य लागू शकते. तेच घडतेय. थोडेसे देण्यासाठी, लोक संपूर्ण आयुष्य घेतात. जीवन एका विशिष्ट संपूर्णतेने घडते. जो संपूर्णपणे देतो त्यालाच जीवन संपूर्णपणे कळेल.

जे निरंतर स्वत:ला आणि त्याच्याजवळ असलेल्या सर्व गोष्टी भविष्यासाठी वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यांच्या हातात त्यांचा वर्तमान नाही, त्यांच्यासाठी भविष्य कुठून येणार? जर तुम्ही वर्तमान चुकवत असाल, तर तुम्हाला कशावरून वाटते की, भविष्य तुमच्याकडून चुकणार नाही?

गौतम बुद्धांबद्दल एक कथा सांगितली जाते. सत्यकथा नाही. ती एक कथा आहे. ते म्हणतात, की जेव्हा गौतम निर्वाण प्राप्त करून परम मुक्तीच्या द्वाराच्या दिशेने गेले, तेव्हा त्यांचे तोंड गेटकडे न करता, त्याची पाठ गेटकडे होती. तेव्हा त्यांना विचारले, ‘का गौतम? आम्ही तुमच्यासाठी अंतिम मुक्तीचे दरवाजे उघडले. तुम्ही त्याकडे पाठ का फिरवत आहात?’ गौतम म्हणाला, ‘माझा गेटमधून आत जाण्याचा कोणताही हेतू नाही, म्हणूनच मी दुसरीकडे पाहत आहे. मी जाण्यापूर्वी प्रत्येकाने त्यातून जाण्याची मी वाट पाहत आहे. मला घाई नाही. मला वाटते की, सर्वांनी जाण्याआधी माझे जाणे, माझ्यासाठी थोडेसे कमी प्रतीचे आहे.’

गेल्या २४ तासांत तुमच्यापैकी किती जण एखाद्याकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहून डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसले? नुसते हसायला का एवढी कंजूषी? तुम्ही काही अश्रू ढाळल्याने तुमचे डी-हायड्रेशन होणार नाहीये. जर तुम्ही श्वास घेण्याच्या आणि इथे राहण्याच्या प्रक्रियेत स्वतःला विसर्जित केले, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी उपाय व्हाल. विघटन हिशोबाने होणार नाही. विघटन देण्यामध्ये होईल - तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण फक्त देण्यामध्ये. फक्त देण्याची प्रक्रिया होणे. जर ते नसेल तर तुम्ही विसर्जित होणार नाही. जर तुम्ही विसर्जित झाले नाही तर तुमच्यासाठी कोणताच उपाय नाही.

मला तुम्ही हे करून बघायला हवंय... येत्या २४ तासांत, तुम्हाला संपूर्ण समर्पणाचा एकतरी क्षण अनुभवता आला पाहिजे. तुम्ही अशाप्रकारे स्वत:ला दिले पाहिजे की, तुमच्यातील प्रत्येक गोष्ट विरघळून गेली पाहिजे. २४ तासांत संपूर्ण देण्याचा एक क्षण. एवढे तर तुम्ही नक्कीच करू शकता ना?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठवाडा भूकंपाने हादरला; नांदेड, परभणीसह हिंगोलीला भूकंपाचे धक्के

LPG EKYC: घरबसल्या मोबाइलवरच करा ई-केवायसी; आता गॅस एजन्सीवर जाण्याची अजिबात गरज नाही, कशी करावी ई-केवायसी?

Artemis 2 Splashdown Video: चंद्रावरील एक ऐतिहासिक प्रवास पूर्ण NASA चे वीर परतले, चंद्रावरुन पृथ्वीवर उतरण्याचा अद्भुत व्हिडिओ

IPL 2026: धडाकेबाज पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आज कोण मारणार बाजी; कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : परभणी, नांदेड हिंगोलीला भूकंपाचे धक्के

SCROLL FOR NEXT