Sadguru sakal
health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : भारतीय देवीदेवता शस्त्र का धारण करतात?

भारतीय संस्कृतीमध्ये आपण नेहमी शांती आणि आनंदाबद्दल बोलतो. मग देवीदेवता हे एवढ्या शस्त्रास्त्रांबरोबर का दाखवले जातात?

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

प्रश्न : भारतीय संस्कृतीमध्ये आपण नेहमी शांती आणि आनंदाबद्दल बोलतो. मग देवीदेवता हे एवढ्या शस्त्रास्त्रांबरोबर का दाखवले जातात? दहाही हातांमध्ये शस्त्रे? ते इतके हिंसक का दाखवले आहेत?

सद्गुरू : कारण त्यांना शस्त्रास्त्रांचे मोक्याचे महत्त्व समजले होते! ह्या देशात आमच्याकडे माजी राष्ट्रपती होते जे रॉकेट व क्षेपणास्त्र वैज्ञानिक होते. शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये खूप शांतीप्रिय लोक सहभागी होते, कारण त्यांना हे समजले होते, की आपल्याकडे आवश्यक शस्त्रे असतील तरच आपण देशामध्ये शांती राखू शकता. अन्यथा, कोणीही आणि केव्हाही तुमच्यावर हल्ला करू शकतो. इतर धर्मांमध्ये त्यांचे देवीदेवता नि:शस्त्र असतात, पण लोक मात्र सशस्त्र असतात. आपण अजून अशा जगात राहत नाही, जिथे मानवी जागरूकता इतकी विकसित झाली आहे की शस्त्रास्त्रांची मुळीच गरज नाही आणि स्व-संरक्षणाची चिंता करण्याची गरज नाही.

या ग्रहावरील सर्वांत यशस्वी राष्ट्रे सामान्यत: शस्त्रास्त्रे निर्माण करूनच टिकून राहिले आहेत. तर, आमच्या देवांनाही याची जाणीव होती. कारण लोक नेहमी देवाकडे संरक्षण आणि कल्याणाची मागणी करत असतात म्हणून, एक निःशस्त्र देव निरुपयोगी देव पाहिला गेला, म्हणून त्यांनी त्याला सशस्त्र केले. परंतु त्यांच्याकडे प्रेम आणि शांतीचे सुद्धा इतर संकेत आहेत. हे तर शांतता आणि बंदूक एकाच वेळी धारण करण्यासारखे आहे.

मुख्यतः हे देवीदेवतांचे हे वर्णन आपल्याला हे समजावून देण्यासाठी आहे, की आपण देव म्हणून जे सूचित करता ते जीवनातील सर्वोच्च पैलू आहेत. जीवन हे शांती ही नाही किंवा हिंसाही नाही. हे बऱ्याच गोष्टींचे एक जटिल मिश्रण आहे. आणि शांती व हिंसा या दोन्ही गोष्टी याचा भाग आहेत.

लोक बऱ्याचदा घरी त्यांच्या बागेत आराम करतात. त्यांना वाटते, की बाग इतकी शांत जागा आहे. परंतु तुम्ही जमिनीच्या खाली खोदले तर मुळे, कृमी-कीटक, माती आणि विविध प्राणी यांच्यात जिवंत राहण्यासाठी सतत संघर्ष चालू असतो. क्षणाक्षणाला, त्यांच्यातील लाखो जीव मारले जात आहेत आणि लाखो जन्म घेत आहेत. हिंसा रहित शांती ही तुमची कल्पना ही अगदी अपरिपक्व शांती आहे.

इथे आपल्या संस्कृतीत आम्ही शांती ही काही बाहेर घडणारी गोष्ट समजली नाही. शांती ही तुमच्या आत घडणारी गोष्ट अशी पाहिली. म्हणूनच इतके सखोल आंतरिक शोध आणि ठाव घेतले गेले. लोक नेहमीच असा विचार करतात, की जंगल हे एक शांत ठिकाण आहे. मला वाटते, की ही एक अगदी अपरिपक्व कल्पना आहे. वन हे खूप हिंसक ठिकाण आहे. आपल्या लक्षात आले आहे का, जेव्हा एखादी गोष्ट हिंसक होते तेव्हा आपण म्हणतो हे जंगली

आहे. प्रत्येक क्षणी कुणीतरी कुणाला तरी मारण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपल्याला असे वाटते की जंगल शांत आहे, तर तुमची दृष्टी फारच वरवरची आहे.

जीवनात तुम्ही थोडेसे खोलवर पाहिले, तर तुम्हाला कळेल की शांती किंवा हिंसा असे काहीही नाही. जीवन प्रक्रियेमध्ये निर्मिती आणि विनाश दोन्ही समाविष्ट आहेत. ते चालूच आहे. जीवनात सर्व पैलूंचा समावेश आहे. म्हणून देवी देवतांना सर्व पैलूंनी चित्रित केले गेले. तुम्ही दहा हातांचे निरीक्षण केल्यास सर्व दहा हात शस्त्रे धारण केलेले नाहीत. हे केवळ हिंसा किंवा शांती नव्हे, तर जीवनाच्या सर्व पैलूंच्या शिखराचे प्रतीक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT