Satara Latest Marathi News 
health-fitness-wellness

Foods For Upset Stomach : पोटाच्या समस्येमुळे हैराण आहात? मग घाबरु नका, 'या' 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

सकाळवृत्तसेवा

सातारा : Foods For Upset Stomach : उन्हाळ्याच्या हंगामात पोटाच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असतात. यामध्ये पोटात पाण्याचे प्रमाण कमी असणे, उघड्यावरील विविध पदार्थ खाणे यामुळे पोटदुखीची समस्या आपल्याला सतावू शकते. जेव्हा आपले पोट खराब असते, त्यावेळी आपल्याला काय खावे हे कळत नाही, त्यामुळे पोटाची समस्या उद्भवते. जेव्हा पोट खराब होते, तेव्हा आपण खाणे टाळण्याचा प्रयत्न करतो. कारण, काही खाल्यास आणखी पोटदुखीचा धोका होऊ शकतो, या भीतीने आपण विविध पदार्थ टाळत असतो. परंतु, अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या आहारात समाविष्ट करून पोटाच्या समस्येपासून दूर ठेऊ शकतात.

उन्हाळ्याच्या हंगामात सर्वप्रथम या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे, ते म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. आपल्या निरोगी आयुष्यासाठी व पोट निरोगी ठेवण्यासाठी पाणी खूप गुणकारी आहे. जर पोट निरोगी असेल, तर शरीर अनेक आजारांना टाळू शकते. वास्तविक, आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर आणि पोटावर परिणाम होत असतो. म्हणून, निरोगी गोष्टी खा.. ज्या आपल्याला आणि आपले पोट निरोगी ठेवण्यास मदत करू शकतील. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे पोट खराब होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो.

पोटाच्या समस्येसाठी 'हे' गुणकारी उपाय :

1. गाजर रस : गाजर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. गाजरांमध्ये बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. गाजराचा रस पिल्याने पोटाची समस्या दूर होते.

2. तांदूळ : पोट खराब झाल्यास तांदळापासून बनलेले पदार्थ खा. जर आपले पोट खराब असेल, तर आपण तांदूळ दहीमध्ये मिक्स करुन देखील खाऊ शकता. असे केल्यास पोटाला आराम देण्याबरोबरच हे पोट थंड करण्यास देखील मदत करू शकतात.

3. सफरचंद खा : पोट खराब असताना सफरचंद खाल्यास  फायदेशीर मानले जाते. एक कप गरम पाण्यात एक चमचा सफरचंदाचा रस घालून प्यायल्यास पोट खराब होणे टळते आणि पोटाच्या समस्येपासून आपला बचाव होऊ शकतो.

4. पपई : पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पपईमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. याशिवाय, यात एंझाइम पपाइन देखील असते, जे पचन सुधारण्यास मदत करते.

5. केळ : केळीमध्ये पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट असतात, ज्यामुळे आपण पाण्याची कमतरता पूर्ण करू शकता. केळी खाल्ल्याने त्वरित ऊर्जा देखील मिळते. आपण केळाचे सेवन केल्यास अतिसाराची समस्या देखील टाळता येऊ शकते.

डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT