shatawari benefits for woman health nagpur news 
health-fitness-wellness

महिलांसाठी सर्व आजारांवर रामबाण उपाय म्हणजे शतावरी, जाणून घ्या जबरदस्त फायदे

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आयुर्वेदामध्ये निसर्गामध्ये मिळणाऱ्या जडी-बुटीचा वापर केला जातो. अनेक जडी-बुटी अशा असतात, ज्याबाबत अनेकांना माहिती नसते. अश्वगंधा आणि गिलोय यांचा वापर गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत. मात्र, शतावरी या जडी-बुटीबद्दल अनेकांना माहिती नाही. प्राचीन भारतीय औषध ग्रंथामध्ये देखील याबद्दल सांगितले आहे. शतावरी प्रत्येकासाठी उपयुक्त आहे, मात्र, सर्वाधिक उपयोगी आहे ते महिलांसाठी. आज याच शतावरीचे उपयोग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मासिक पाळीमध्ये उपयुक्त -
शतावरीचे सेवन केल्यास मासिक पाळीमध्ये येणाऱ्या समस्या झटपट दूर होतात. अनेका मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होणे, अवेळी रक्तस्त्राव होणे, दुखणे, पीसीओडी आणि पीसीओएस आदी समस्यांचा सामना करावा लागतो. पण नियमितित तुम्ही शतावरीचे सेवन केल्यास या समस्यांपासून सुटका मिळेल.

गर्भधारणेमध्ये मदत -
अनेक महिलांना इच्छा असूनही गर्भधारणा होत नाही. त्यांना शतावरी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक महिलेच्या मेनस्ट्रुअल सायकलमध्ये ओव्ह्युलेशनचा एक फेज असतो. त्यावेळी महिला गर्भधारण करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर गर्भ राहण्याची शक्यता असते. मात्र, अनेक महिला अशा असतात, की त्यांच्या दोन मासिक पाळींमध्ये ओव्ब्युलेशन पिरीयड्सच येत नाही. अशा महिलांना नियमित शतावरीचे सेवन केल्यास त्यांना गर्भधारणा होण्यास मदत होते.

गर्भधारणा आणि प्रसूतीमध्ये लाभदायक -
शतावरी महिलांना गर्भधारणेमध्ये मदत करते अगदी त्याचप्रमाणे गर्भावस्थेमध्ये देखील लाभदायक आहे. त्यामुळे फोलेटचे प्रमाण वाढते आणि गर्भावस्थेमध्ये महिलेला फोलेटची जास्त गरज असते. शतावरी अर्भकाच्या डोक्यापासून तर पायांपर्यंत सर्वच अंगाचा विकास करण्यास मदत करते. प्रसूती झाल्यानंतर देखील शतावरी घेणे लाभदायक ठरते. त्यामुळे दूध वाढते. कोणती महिला ही प्रसूतीच्या नंतर शतावरीचे सेवन करत असेल तर तिच्या बाळाला दुधाची कमी जाणार नाही.

शरीरातील तणाव कमी करण्यास मदत -
तुम्हाला ताण-तणाव, भीती किंवा डिप्रेशनची समस्या असेल तर तुम्ही शतावरीचे सेवन करू शकता. शरीरामध्ये ताणतणाव वाढतो त्यावेळी शरीरातील हार्मोनमध्ये देखील बदल होतात. मात्र, शतावरीचे सेवन केल्यास हार्मोन बॅलेन्स होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील तणाव देखील कमी होतो.

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत -
शतावरीमध्ये अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण असते. त्यामुळे महिलांनी शतावरीचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच कोणताही आजार होत नाही.  

असे करा सेवन -
रात्री झोपण्याच्या दोन तासांपूर्वी शतावरीचे सेवन करा. गरम दुधामध्ये हळदी आणि शतावरी चूर्ण घालू पिऊ शकता. तसेच दुधामध्ये तूप घालून देखील शतावरीचे सेवन करू शकता. 
                                                                                                                    (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Radhanagari Dam Gate Opens : राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा उघडला; धरणातून 2628 क्युसेक विसर्ग, घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT