Fitness
Fitness 
health-fitness-wellness

हेल्दी फूड : फिटनेस हा स्व-प्रेमाचाच भाग!

शौमा मेनन

फेमिनिझम (स्त्रीत्व) याची व्याख्या तशी खूपच सोपी आहे. ‘महिला आणि पुरुषांसाठी समान अधिकार...’ मात्र, हा संदेश थेट आणि स्पष्ट हवा. या गोष्टीचा फार मोठा गवगवा करण्याची गरज नाही किंवा या शब्दाला कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रसिद्धी देण्याचीही आवश्‍यकता नाही. दडपल्या गेलेल्या महिलांना समान संधी देण्याची गरज आहे, त्यांना त्यांच्या क्षमतांनुसार संधी दिली गेली पाहिजे, त्यांच्या स्त्री असण्यामुळे नको. ही चर्चा आपण पुन्हा कधीतरी करूयात. 

महिलांच्या हे लक्षात आले आहे का? तुम्ही जीममधील वजन उचलण्याच्या सरावासाठी पुढे येता, तेव्हा अगदी थोडे लोक तुमच्या मदतीसाठी पुढे येतात. आणि माझ्या हेही लक्षात येत नाही, की यावेळी महिला एवढ्या लाजतात कशासाठी? ते तुमच्या ताकद आणि इच्छाशक्तीला दाद देत असतात तिला अधोरेखितच करीत असतात, हे तुमच्या लक्षात येत नाही का? मला विचाराल तर, लोक तुमच्याकडे डोळे विस्फारून पाहात असतील, तर त्यांना तसे करु द्यात...

आजच्या काळात महिला आणि पुरुषांचे आयुष्य खूप धकाधकीचे झाले आहे. बदल काय दिसतो आहे, तर पुरुष महिलांना दैनंदिन कामांमध्ये मदत करीत आहेत आणि जबाबदारी स्वीकारत आहेत. महिलांनो, याचा फायदा घ्या. तुम्हाला ‘मी कामात खूप व्यग्र आहे, मला मुले आहेत, माझा बॉस खूप रागीट आहे, मला घरात खूप कामे पडतात,’ हे आता सांगण्याची आता गरज नाही. पुरुषांनाही हे सर्व करावे लागते आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुमच्या आरोग्यावर तुम्हीच ताबा मिळवा. तुमच्या शरीराचाही ताबा घ्या. स्वःसाठी वेळ द्या, त्यामुळे तुम्ही बलवान व्हाल आणि तुम्हाला कराव्या लागणाऱ्या कोणत्याही कामासाठी प्रचंड आत्मविश्वास मिळेल. फिटनेस हा स्व-प्रेमाचाच एक भाग आहे. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी असल्यासच तुम्ही भरपूर हालचाली कराल आणि चांगले खाल. आणि त्यातून तुमच्यावर सोपविलेल्या अनेक जबाबदाऱ्या ताकदीने पेलाल. या महिला दिनी... स्वतःला आणि तुमच्या आयुष्यातील सर्व पुरुषांना एक प्रेमाची मिठी मारा, स्वतःची पाठ थोपटा आणि समोर येणारी प्रत्येक जबाबदारी स्वीकारल्याबद्दल स्वतःचे कौतुक करा....

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Lok Sabha Constituency : मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी; राजकीय डावपेच कुणाच्या पथ्यावर?

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SCROLL FOR NEXT