Healthy Food Sakal
health-fitness-wellness

हेल्दी फूड : अधूनमधूनचा उपवास फायद्याचा कसा कराल?

आपण सुरुवातीला अधूनमधून (इंटरमिटंट) उपवास म्हणजे काय, हे जाणून घेऊयात. हा शिस्तबद्ध जीवनपद्धतीचा एक भाग असून, १६ तासांचा उपवास व ८ तास खाणे अशी त्याची व्याख्या आहे.

शौमा मेनन

आपण सुरुवातीला अधूनमधून (इंटरमिटंट) उपवास म्हणजे काय, हे जाणून घेऊयात. हा शिस्तबद्ध जीवनपद्धतीचा एक भाग असून, १६ तासांचा उपवास व ८ तास खाणे अशी त्याची व्याख्या आहे.

अधूनमधून उपवासाचा नियम

हे अतिशय सोपे आहे. तुम्ही सलग १६ तास काहीच खाऊ नका व उरलेल्या आठ तासांत तुमचा आहार घ्या.

या काळात तुम्ही काय आहार घ्याल?

पाणी, ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी यांसारखे झिरो कॅलरी असलेले व तुमच्यासाठी फायद्याचे पदार्थ.

तुम्ही हवे ते खाऊ शकता का?

नक्कीच नाही. तुम्ही अधिक प्रथिने, कॉप्लेक्स कार्ब आणि उपयुक्त फॅट्स असलेला तुम्हाला फायद्याचा आहार घेऊ शकता. तुमचे ध्येय वजन कमी करण्याचे असल्यास अधूनमधून उपवास करीत कॅलरीजचे प्रमाण कमी ठेवणे फायद्याचे ठरते.

अधूनमधून उपवासामागचे विज्ञान काय?

तुम्ही उपवास करता, तेव्हा तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण आणि इन्शुलिनची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होते व त्याचबरोबर ह्यूमन ग्रोथ हार्मोन्समध्ये मोठी वाढ नोंदविली जाते. त्यामुळेच अनेक जण वजन कमी करण्याचे ध्येय असल्यास अधूनमधून उपवास निवडतात, कारण त्यातून कॅलरीजचे प्रमाण नियंत्रणात राखले जाते आणि फॅट्स जळतात.

तुमच्यासाठी अधूनमधून उपवास फायद्याचा ठरेल का?

तुम्ही आरोग्यदायी पदार्थ खाणे, खाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आणि सातत्याने उपवास करणे या गोष्टींचे पालन केल्यास तुम्हाला आरोग्याचे खूप चांगले फायदे दिसून येतील.

हा फॅट्स कमी करण्याचा, तुमची चयापचायची स्थिती सुधारण्याचा खूप परिणामकारक मार्ग आहे. यामुळे तुमचे आयुष्य अगदी सुकर होते, हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT