Healthy Food Sakal
health-fitness-wellness

हेल्दी फूड : मधुमेह आणि लो-कार्ब डाएट

मधुमेह असलेले अनेक लोक लो-कार्ब डाएटचा स्वीकार करतात, याचे कारण त्यातून मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते, वजन कमी करता येते व हा पाळण्यासाठी अत्यंत सोपा डाएट प्लॅन आहे.

शौमा मेनन

मधुमेह असलेले अनेक लोक लो-कार्ब डाएटचा स्वीकार करतात, याचे कारण त्यातून मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते, वजन कमी करता येते व हा पाळण्यासाठी अत्यंत सोपा डाएट प्लॅन आहे. लो-कार्ब हा लवचिक डाएट प्लॅन आहे व तो विविध प्रकारचे मधुमेह असणाऱ्यांना पाळता येतो. टाइम-2 हा मधुमेह अतिवजनाशी संबंधित आहे व डाएट चेंज करणे, व्यायाम आणि वजन कमी करणे तो नियंत्रणात आणण्याचा पाया आहे. लो-कार्ब डाएट वजन कमी करण्यासाठी व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी सांगितला जातो.

लो-कार्ब डाएट का पाळावा...

कार्बोहायड्रेट्स असे न्यूट्रियंट आहे, ज्याचा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढविण्यात मोठा हातभार असतो व त्यासाठी शरीराला अधिक प्रमाणात इन्शुलिनची गरज पडते किंवा त्याची निर्मिती करावी लागते. मधुमेह असणाऱ्यांसाठी साखरेची पातळी कमी होणे फायद्याचेच ठरते. इन्शुलिनची कमी प्रमाणात पडणारी गरज शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण ठेवते व इन्शुलिनला होणारा प्रतिकारही कमी होतो. त्यातून टाइप-2च्या मधुमेह बरा होण्यासाठी मदत होते. इन्शुलिन शरीरात फॅट साठवून ठेवणारे हार्मोन आहे. त्यामुळे शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण लो-कार्ब डाएटच्या मदतीने कमी केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.

लो-कार्ब डाएटचे फायदे

  • एचबीए१सीची पातळी कमी होते.

  • वजन कमी करण्यास मदत होते.

  • शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे नियंत्रणात येते

  • दिवसभर शरीरात ऊर्जेचे प्रमाण चांगले असल्याचे जाणवते.

  • साखर आणि इतर स्नॅक्स खाण्याची इच्छा होत नाही.

  • शरीराच्या सारख्या निर्माण होणाऱ्या तक्रारी कमी होतात.

लो-कार्ब कशाला म्हणाल?

  • मॉडरेट कार्बोहायड्रेट्स - 130 ते 225 ग्रॅम कार्ब

  • लो-कार्बोहायड्रेट्स - 130 ग्रॅमपेक्षा कमी कार्ब

  • व्हेरी लो कार्बोहायड्रेट्स - 30 ग्रॅमपेक्षा कमी कार्ब

सामान्यपणे, तुमचे कार्बोहाड्रेट्सचे प्रमाण जितके कमी, तेवढी तुमची वजन कमी होण्याची शक्यता वाढते. त्यातून शरीरातील सारखेचे प्रमाणही कमी होते. तुम्ही तुमच्या शरीराला मानवेल अशी कार्बोहायड्रेट्सची पातळी निवडणे आवश्यक आहे.

लो-कार्ब डाएटमध्ये काय असावे?

  • भाज्यांचे प्रमाण विपुल असावे.

  • नैसर्गिक स्रोतांपासून मिळणाऱ्या फॅट्सचे प्रमाण थोडे वाढवावे.

  • मर्यादित प्रमाणात प्रथिने घ्यावीत.

  • प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, साखर व धान्यांवरील अवलंबित्व कमी करावे.

  • कमी झालेल्या कॅलरीज भरून काढण्यासाठी फॅट्स आणि प्रथिनांची मदत घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT