Shweta-Gulati 
health-fitness-wellness

माझा फिटनेस : मन आणि शरीरात हवे आरोग्यदायी संतुलन!

श्‍वेता गुलाटी, अभिनेत्री

फिटनेस म्हणजे शरीर व मन आरोग्यदायी असले पाहिजे. स्वस्थ मन असलेली व्यक्‍ती सर्वांत तंदुरुस्त असते. मन प्रसन्न व सकारात्मक असल्यास शरीरही उत्तम साथ देते. वेलनेस व फिटनेस चांगला राहण्यासाठी पुरेसे खा; पण योग्य खा आणि व्यायाम करा. तुम्हाला व्यायाम करण्यास वेळ मिळत नसल्यास खाण्यावर नियंत्रण ठेवा. मन व शरीरामध्ये आरोग्यदायी संतुलन ठेवण्याची गरज असते. तुम्ही मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही शरीर तंदुरुस्त बनू शकत नाही. म्हणून प्रथम कोणत्याही स्थितीमध्ये, तसेच व्यायाम करताना मनावर नियंत्रण ठेवा. सर्व गोष्टींची सुरुवात प्रसन्न मनापासूनच होते. तुम्ही तंदुरुस्त राहण्याचा निर्धार केला, तर तुम्ही ते करू शकता, तुम्ही धावण्याचा निर्धार केल्यास धावू शकता. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नेहमी घातक ठरते, म्हणून सकारात्मक राहणे सर्वांत महत्त्वाचे आहे. 

मी पाच महिन्यांपासून जिममध्ये गेले नाही. वर्कआउटही केला नाही. सुरुवातीला लॉकडाउनमुळे तसे घडले; पण नंतर ‘सोनी सब’वरील ‘तेरा यार हूँ मैं’ या मालिकेच्या व्यग्र वेळापत्रकामुळे व्यायामासाठी वेळ मिळाला नाही. म्हणून मी तंदुरुस्त राहण्यासाठी कमी खाण्याचा प्रयत्न करते. मी कमी कॅलरीचे सेवन करते, म्हणजेच मला दिवसाला १ हजार ४०० कॅलरीचे सेवन करायचे असल्यास फक्त ९०० ते १००० कॅलरीचेच सेवन करते. अशाप्रकारे मी वजनावर नियंत्रण ठेवते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्यदायी स्नॅक्‍स म्हणून नट्‌स, फळे आणि कधी-कधी नारळाचे पाणी सेवन करते. चित्रीकरणादरम्यान खूप भूक लागल्यास या पदार्थांचाच मनसोक्‍त आस्वाद घेते. मी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केल्याशिवाय राहू शकत नाही. यामध्ये प्रोटिन पावडर, दही व फळांचा समावेश आहे. व्यायाम करताना संगीत ऐकण्यासंदर्भात मी खूपच मूडी आहे. मी कधी-कधी शास्त्रीय संगीत ऐकते, तर कधी हिंदी गाणी ऐकते आणि कधी हार्ड रॉक गाणीही ऐकते! आपणा सर्वांची चांगले दिसण्याची आणि उत्तम व सुदृढ शरीरयष्टी असण्याची इच्छा असते. हीच माझ्यासाठी प्रेरणादायी बाब आहे. याव्यतिरिक्‍त मला वाटते की, व्यायामामुळे माझ्या शरीरयष्टीमध्ये होत असलेले बदल पाहून मला प्रेरणा मिळते. मी माझ्या शरीरावर येणारे कट्‌स, विशेषत: ॲब्स, बायसेप्स व बॅक पाहते, तेव्हा जाणवते की माझ्या शरीरामध्ये बदल होण्यास सुरुवात झाली आहे. यामधून मला तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरणा मिळते. 

माझ्या मते, सकारात्मक राहणे हा फिटनेसचा सर्वांत मोठा मंत्र आहे. म्हणून सर्वांनी एकमेकांप्रती सकारात्मक, आनंदी आणि दयाळू राहणे आवश्‍यक आहे. माझ्या मते, निम्मे युद्ध येथेच जिंकले जाते आणि उर्वरित व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे, योग्य आहार सेवन करणे व आरोग्यदायी जीवन जगणे यासह जिंकले जाते. 

शब्दांकन - अरुण सुर्वे 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

Maharashtra Politics : शरद पवारांचं वय झालंय, ते आता थकलेत, 'राष्ट्रवादी'ने कोणत्यातरी पक्षासोबत जावे; मंत्री चंद्रकांतदादांचा थेट सल्ला

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT