health-fitness-wellness

Insomnia: झोप लागत नाही? 'या' व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता

सकाळ डिजिटल टीम

Sleeplessness due to vitamin deficiency:झोप न येणे किंवा कमी झोप येण्यामुळे शरीराचे खूप नुकासान होते. या समस्येला इंसोमनिया असे म्हणतात. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे झोप लागत नाही. शरीरातील अंतर्गत प्रक्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो आणि मन शांत राहात नाही. चला जाणून घेऊ कोणत्या व्हिटॅमिनटच्या कमतरतेमुळे झोप येत नाही आणि कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास फायदा होईल.

'व्हिटॅमिन डि'च्या कमतरतेमुळे झोप येत नाही.

'व्हिटॅमिन डि'च्या कमतरतेमुळे शरीर आणि मनाला थकवा येतो. संशोधकांच्या मतानुसार, शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचा पातळी कमी झाल्यास इंसोमनिया किंवा झोपण्याचे रुटीन बिघडण्याचे कारण बनू शकते. व्हिटॅमिन डि कमी पूर्ण करण्यासाठी सकाळ संध्याकाळ कोवळ्या उन्हामध्ये फिरणे फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन डीचे भरपूर प्रमाण असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास व्हिटॅमिन डि कमी पूर्ण होऊ शकते (how to increase vitamin d) आणि तुम्ही शांत आणि गाढ झोपू शकता.

  • मशरूम

  • गाईचे दुध

  • सोया दुध

  • संत्र्याचा रस

  • ओटमीलचे सेवन

इंसोमनियामुळे होऊ शकते व्हिटॅमिन बी6 ची कमतरता

डोक्यामध्ये मेलोटोनिन (Melatonin) आणि सेरोटोनिन (serotonin)पुरेश्या प्रमाणामुळे गाढ झोप आणि ताजेतवाने वाटण्यासाठी गरजेचे आहे. पण व्हिटॅमिन बी6च्या कमतरतेमुळे दोन्ही हार्मोनचे निर्माण होण्यास अडचण येऊ शकते. ज्यामुळे झोप न येणे आणि इंसोमनियाच्या समस्या निर्माण होऊ शकते. NHSनुसार व्हिटॅमिन बी6 कमतरता पूर्ण करण्यासाठी खालील पदार्थांचे खाऊ करू शकता. (vitamin b6 rich foods)

  • चिकन

  • शेंगदाणे

  • सोयबीन

  • ओटस्

  • केळे

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT